Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल ) स्पर्धेत एकीकडे युवा खेळाडू गाजवत असतानाच चेन्नई सुपरकिंग्जचा महेंद्रसिंह धोनी रविवारी पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. ४२ व्या वर्षी त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या कामगिरीने चेन्नई सुपर किंग्जचे चाहते तर सुखावलेच त्याचबरोबर धोनीचे समकालीन खेळाडूंनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धोनीचा एकेकाळचा सहकारी सुरेश रैना याने प्रेरणेला वय माहित नसतं… अशा शब्दांमध्ये धोनीच्या धडाकेबाज खेळाचे कौतुक केले आहे. ( IPL 2024 : MS Dhoni Was Seen In His Old Rhythm Against Delhi Capitals)
महेंद्रसिंह धोनी हे नाव आज कोट्यवधी क्रिकेट रसिकांसाठी प्रेरणादायी आहे. एका छोट्या शहरातून आलेला तरुण रेल्वेकडून खेळत भारतीय संघात स्थान मिळवतो. काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होतो. आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला 2007 T20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखालील विजेतेपद मिळवून देतो. त्याचा हा स्वप्नवत प्रवास प्रेरणादायी नसेल तरच नवल. मात्र आता चाळीशी ओलांडलेल्या महेंद्रसिंह धोनीमध्ये किती क्रिकेट उरलं आहे? या प्रश्नाचे उत्तर त्याने रविवारी विशाखापट्टणम येथील मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दिले. या सामन्यात ४२ वर्षाच्या धोनीने नेत्रदीपक फटकेबाजी करत चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ( IPL 2024 : MS Dhoni Was Seen In His Old Rhythm Against Delhi Capitals)
धोनीची तुफानी खेळी
धोनी या मोसमात प्रथमच फलंदाजीसाठी आला आणि त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. गेली एक वर्षांहून अधिक काळ त्याचे चाहते ज्या खेळीची वाट पाहत होते. या सामन्यात आठव्या क्रमांकावर आलेल्या धोनीने 16 चेंडूंचा सामना करत 37 धावांची तुफानी खेळी खेळली. धोनीने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर आकर्षक फटकेबाजी केली. धोनीने चार चौकार आणि तीन षटकार फटकावत चाहत्यांची मने जिंकली. धोनीने रवींद्र जडेजासोबत ५१ धावांची भागीदारी केली, पण ती सीएसकेला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
Tha7⃣a turning the clock back! ⌚⏪ 💛#ThalaThalaDhaan #WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/6nRztt59pS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 1, 2024
धोनी ठरला T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा यष्टिरक्षक फलंदाज
२०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आयपीएलमधील त्याचे स्थान आजही अबाधित आहे. रविवारी त्याने केलेल्या धडाकेबाज खेळीने आणखी एक विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा धोनी तिसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे सोडले, ज्याच्या नावावर 6962 धावा आहेत. त्याच्या झंझावाती खेळीमुळे धोनीने त्याच्या T20 कारकिर्दीत 7036 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि इंग्लंडच्या जोस बटलरनंतर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डी कॉकने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 8578 धावा केल्या आहेत तर बटलरने 7721 धावा केल्या आहेत. ( IPL 2024 : MS Dhoni Was Seen In His Old Rhythm Against Delhi Capitals)
‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव यष्टीरक्षक
फलंदाजीसोबतच धोनीने दिल्लीविरुद्ध यष्टिरक्षणातही आपले कौशल्य सिद्ध केले. त्याने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल घेतला. टी-२० मधील यष्टीरक्षक म्हणून त्याची ही ३००वी विकेट होती. बळींचे त्रिशतक झळकावणारा धोनी जगातील एकमेव यष्टीरक्षक आहे. पाकिस्तानचा कामरान अकमल आणि भारताचा दिनेश कार्तिक 274-274 शिकारांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर क्विंटन डी कॉक 270 विकेट्ससह तिसऱ्या आणि जोस बटलर 209 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. 2008 मध्ये लीगच्या सुरुवातीपासून आयपीएलशी संबंधित असलेल्या धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा सीएसकेला विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या वर्षी गुजरात टायटन्सला हरवून आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. यंदाच्या आयपीएलपूर्वी धोनीने कर्णधारपदाची धुरा सोडली. रुतुराज गायकवाड हा चेन्नईचा नवा कर्णधार झाला.
धोनीच्या खेळीचे सुरेश रैनाकडून कौतूक
प्रेरणेला वय माहित नसते, ४२ व्या वर्षीही माही भाईचे अतुलनीय फलंदाजीचे परक्रिम हे त्याच्या खेळाबाबतच्या समर्पणाचा पुरावा आहे, अशा शब्दांमध्ये माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने महेंद्रसिंह याचे कौतूक केले आहे.
Inspiration knows no age! Witnessing @msdhoni Mahi Bhai’s incredible batting prowess at 42 is a testament to his unparalleled spirit and dedication 🙌 @JioCinema #DCvCSK pic.twitter.com/W8WzD76bcF
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 31, 2024
हेही वाचा :
Mayank Yadav IPL 2024 : आयपीएलचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे?
IPL 2024-Virat Kohli : विराटचा वॉर्नरला ‘धोबीपछाड’,सलामीवीर म्हणून ‘या’ विक्रमाची नाेंद
The post सीएसकेच्या ‘थलायवा’साठी वय केवळ आकडेवारी..! धोनीचा ४२ व्या वर्षी नवा विक्रम appeared first on Bharat Live News Media.