परभणी: पूर्णा रेल्वे स्थानकातून महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : पूर्णा येथील रेल्वे स्थानकावरून एका महिलेची सव्वा लाखाच्या दागिन्यासह बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.३०) सकाळी घडली. या प्रकरणी पूर्णा रेल्वे पोलीस चौकीत महिलेने तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहराच्या आनंदनगर येथील रहिवाशी श्रध्दा व्यंकटराव मुळे (वय ३५) कामानिमित्त पूर्णा येथून परभणीला जाणार होत्या. त्यासाठी त्या शनिवारी सकाळी तपोवन रेल्वे एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आल्या. नांदेडहून तपोवन एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्या डब्यात चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील दागिने असलेली बॅग लंपास केली.
या बॅगेत दीड ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (१० हजार), सहा ग्रॅम सोन्याची पोत (४२ हजार) दीड ग्रॅम सोन्याची नथ (३५०० रुपये), दीड ग्रॅम मोत्याची नथ (१० हजार), दीड ग्रॅम सोन्याचा खडा (३५०० रूपये), दोन ग्रॅम कानातील रिंग (१४ हजार) असे एकूण १ लाख २५ हजारांचे दागिने होते.
रेल्वे स्टेशन व डब्यात प्रवाशांचे मोबाईल, बॅग, दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारांना आळा घाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
– अरोमासिंह ठाकूर, विशेष महानिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल
हेही वाचा
परभणी : डॉग तेजाकडून सेलू स्थानकासह रेल्वे गाड्यांची तपासणी
परभणी: मिरखेल- माळटेकडी लोहमार्गावर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी
परभणी: पूर्णा तालुक्यातून अंतरवालीकडे हजारो मराठा बांधव रवाना
Latest Marathi News परभणी: पूर्णा रेल्वे स्थानकातून महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास Brought to You By : Bharat Live News Media.