बंगळुरूचे कोलकाताला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीासाठी उतरेल्या बंगळुरूने विराटच्या नाबाद 83 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 फलंदाज गमावून 182 धावा केल्या. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोलकातासमोर 183 धावांचे लक्ष्य आहे.  (RCB vs KKR) पहिल्या पॉवर प्लेमध्ये बंगळुरू 1 बाद 61 … The post बंगळुरूचे कोलकाताला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य appeared first on पुढारी.

बंगळुरूचे कोलकाताला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीासाठी उतरेल्या बंगळुरूने विराटच्या नाबाद 83 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 फलंदाज गमावून 182 धावा केल्या. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोलकातासमोर 183 धावांचे लक्ष्य आहे.  (RCB vs KKR)
पहिल्या पॉवर प्लेमध्ये बंगळुरू 1 बाद 61
नाणेफेकीत पराभूत झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 विकेट गमावून 61 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या रूपात आरसीबीला पहिला झटका बसला. त्याने आपल्या खेळीत षटकार लगावून 8 धावा केल्या. त्याला गोलंदाज हर्शित राणाने स्टार्ककरवी झेलबाद केले. यानंतर विराट आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली. (RCB vs KKR)
बंगळुरूला दुसरा झटका; कॅमरून ग्रीन क्लीन बोल्ड
सामन्याच्या नवव्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या आंद्र रसेलने कॅमरून ग्रीनला क्लीन बोल्ड करत बंगळुरूला दुसरा धक्का दिला. ग्रीनने आपल्या खेळीत 21 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले.
कोहलीचे अर्धशतक; विराटच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद
कोलकाताविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना विराटने आपले अर्धशतक पुर्ण केले. त्याने 36 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात तीन षटकार मारताच विराट आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या आयपीएलमध्ये  त्याने बंगळुरूकडून खेळताना एकूण 240 षटकार लगावले आहेत.
ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात बंगळुरूला तिसरा झटका
सामन्याच्या 15 व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मॅक्सवेलच्या रूपात बंगळुरूचा तिसरा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकताचा फिरकीपटू सुनील नरेनने रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 19 बॉलमध्ये 28 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
बंगळुरूला चौथा धक्का; रजत पाटीदार स्वस्तात माघारी
सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारच्या रूपात बंगळुरूचा चौथा फलंदाज बाद झाला. त्याला कोलकाताचा गोलंदाज आंद्रे रसेलने रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. रजतला आपल्या खेळीत 4 बॉलमध्ये 3 धावा करता आल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी विराटसोबत 14 बॉलमध्ये 20 धावांची भागिदारी केली.
रजत पाठोपाठ अनुज रावत तंबूत
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अनुज मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही. त्याला कोलकाताचा गोलंदाज हर्शित राणाने सामन्याच्या 18 व्या ओव्हरमध्ये फिलिप सॉल्टकरवी झेलबाद केले. अनुजला आपल्या खेळीत 3 बॉलमध्ये 3 धावा करता आल्या.
शेवटच्या बॉलवर बंगळुरूला धक्का
बंगळुरूच्या डावाच्या शेवटच्या बॉलवर दिनेश कार्तिक बाद झाला.
संघ :
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर : महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग.

Match 10. Kolkata Knight Riders Won the Toss & elected to Field https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL #IPL2024 #RCBvKKR
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
हेही वाचा :

Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली, निवडणूक आयोगाची मान्यता
Akola News : कवठा -पुंडा मार्गावर अनैतिक प्रेमसंबंधातून खून: १२ तासांत आरोपी गजाआड
Prakash Ambedkar : तीन दिवसांत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार : ॲड. प्रकाश आंबेडकर   

The post बंगळुरूचे कोलकाताला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य appeared first on Bharat Live News Media.