अमेरिकेत बाल्टिमोर पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

अमेरिकेत बाल्टिमोर पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील २.५७ किमी लांबीचा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्यानंतर बेपत्ता झालेल्या ६ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. कंटेनर जहाजातील दोन वैमानिकांसह भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली शोधमोहीमही बुधवारपर्यंत थांबवण्यात आली होती.

Baltimore Bridge Collapse: Six missing workers presumed dead, says Maryland state police
Read @ANI Story | https://t.co/od3CC572Ai#BaltimoreBridgeCollapse #Maryland #US pic.twitter.com/GZz2YdjZ7K
— ANI Digital (@ani_digital) March 27, 2024

मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. फ्रान्सिस स्कॉट पूल मालवाहू जहाजाची धडक बसल्याने कोसळला. मोठ्या मालवाहू जहाजाने पुलाला धडक दिल्याने पॅटापस्को नदीत कोसळला. या दुर्घटनेत २० हून अधिक लोक आणि अनेक वाहने नदीत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती बाल्टिमोर शहर अग्निशमन विभागाने दिली होती. यातील बेपत्ता झालेल्या सहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे, मेरीलँड पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :

मॉस्‍को हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन
‘युद्ध’ थांबवा म्‍हणताच इस्रायलने अमेरिकेवरच डोळे वटारले!
मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला: ३ संशयितांनी कोर्टात गुन्हा केला कबूल

The post अमेरिकेत बाल्टिमोर पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.