Crime News : अखेर नराधम सावत्र बापाला 22 वर्षे सक्तमजुरी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र बापाला न्यायालयाने 22 वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. ही घटना मे 2020 मध्ये थेरगाव परिसरात … The post Crime News : अखेर नराधम सावत्र बापाला 22 वर्षे सक्तमजुरी.. appeared first on पुढारी.

Crime News : अखेर नराधम सावत्र बापाला 22 वर्षे सक्तमजुरी..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र बापाला न्यायालयाने 22 वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. ही घटना मे 2020 मध्ये थेरगाव परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. घटनेच्या वेळी पीडिता सातवीत शिकत होती, तर तिची आई सोसायटीत साफसफाईची कामे करत होती.
घटनेच्या दिवशी पीडितेची आई घरी नसताना सावत्र वडिलांनी पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तसेच, तिला पट्ट्याने मारहाण करत या प्रकाराची वाच्यता केल्यास आईसह तिला मारून टाकण्याची धमकी दिली. यादरम्यान, भेदरलेल्या मुलीकडे आईने चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणाचा जाब पतीला विचारल्यानंतर पतीने तिलाही शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र
दाखल केले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब—ह्मे यांनी कामकाज पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर व तपास अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ब—ह्मे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सपना देवतळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलिस कर्मचारी डी. एस. पांडुळे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
हेही वाचा

पुणे : पालिकेचा महावितरणला दणका; परस्पर रस्ते खोदाई भोवली
कोल्हापूर : हेरिटेज समिती गुल, अनावश्यक गोष्टींना निधी फुल्ल
Earthquake in Fiji : फिजीची राजधानी भूकंपाने हादरली; ६.४ रिश्टर स्केलची नोंद

Latest Marathi News Crime News : अखेर नराधम सावत्र बापाला 22 वर्षे सक्तमजुरी.. Brought to You By : Bharat Live News Media.