सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, निफ्टी २२,१०० वर, ‘हे’ हेवीवेट स्टॉक्स तेजीत

सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, निफ्टी २२,१०० वर, ‘हे’ हेवीवेट स्टॉक्स तेजीत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत असूनही भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७२,९६० वर गेला. तर निफ्टीने १५० अंकांच्या वाढीसह २२,१५० अंकाला स्पर्श केला. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फायनान्सियल स्टॉक्सच्या मजबूत कामगिरीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढून २,९५० रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच मारुती, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही तेजीत आहेत. तर नेस्ले इंडिया, विप्रो या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
एनएसई निफ्टीवर अदानी पोर्ट्स, रिलायन्स, मारुती, बजाज ऑटो, आयशर मोटर्स हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर अपोलो हॉस्पिटल, यूपीएल, ब्रिटानिया हे शेअर्स लाल चिन्हात खुले झाले आहेत.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी ऑइल अँड गॅस १ टक्के वाढला आहे. निफ्टी ऑटो, बँक, फायनान्शिअल, एफएमसीजी, मेटल आणि रियल्टीदेखील तेजीत आहेत.
Latest Marathi News सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, निफ्टी २२,१०० वर, ‘हे’ हेवीवेट स्टॉक्स तेजीत Brought to You By : Bharat Live News Media.