पुणेकरांनो सावधान ! सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश; उष्णतेची लाट तीव्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र झाली असून, मंगळवारी (दि. 26) पुणे शहराची नोंद राज्य अन् देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेली. वर्दळीच्या रस्त्यावर दुपारी 3 जणू संचारबंदी लागल्यासारखे दृश्य पाहायला मिळते. शहरात गेल्या पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढतच आहे. शहराचे सरासरी तापमान 38.5 अंशांवर गेले आहे. तर … The post पुणेकरांनो सावधान ! सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश; उष्णतेची लाट तीव्र appeared first on पुढारी.

पुणेकरांनो सावधान ! सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश; उष्णतेची लाट तीव्र

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र झाली असून, मंगळवारी (दि. 26) पुणे शहराची नोंद राज्य अन् देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेली. वर्दळीच्या रस्त्यावर दुपारी 3 जणू संचारबंदी लागल्यासारखे दृश्य पाहायला मिळते. शहरात गेल्या पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढतच आहे. शहराचे सरासरी तापमान 38.5 अंशांवर गेले आहे. तर कोरेगाव पार्क आणि लवळे भागाचे तापमान दोन दिवसांपासून 40 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी दिलेला सल्ला लक्षात ठेवा.
शहराची आर्द्रता (टक्के)
शिवाजीनगर : 55
पाषाण : 69
लोहगाव : 46
उन्हात जात असाल तर…

सुती कपडे, टोपी, रुमाल,
सनकोट, गॉगल, हेल्मेट वापरा.
पाणी, ताक, सरबत घेत राहा.
शक्यतो सावलीत थांबा.
उन्हात एकाच जागी खूप वेळ थांबू नका.
काम नसेल तर दुपारी 1 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळा.

मंगळवारचे कमाल-किमान तापमान
कोरेगाव पार्क 40 (23.5), लवळे 40 (24.8), शिवाजीनगर 38 (18.9),
पाषाण 38 (20), लोहगाव 39 (21.7), चिंचवड 38 (22.4), मगरपट्टा 38 (24.2), एनडीए 38 (18.1).
आर्द्रता 50 ते 55 टक्क्यांनी घटली
अगदी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील सरासरी आर्द्रता 70 ते 78 टक्क्यांच्या जवळपास होती. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रखर उन्हाचा चटका सुरू होताच, ती आर्द्रता 65 ते 60 टक्क्यांवर खाली आली. मंगळवारी (दि.26) ती 46 ते 55 टक्के इतकी झाली आहे.
हेही वाचा

हुक्का बार छाप्यात पकडला गेला Munawar Faruqui, मुंबई पोलिसांच्या तब्यात
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा !
शेट्टी आघाडीत न आल्यास आम्ही उमेदवार देणार : जयंत पाटील

Latest Marathi News पुणेकरांनो सावधान ! सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश; उष्णतेची लाट तीव्र Brought to You By : Bharat Live News Media.