Loksabha election | नव्वद टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे, तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. आता सर्वांना मिळून कमी मतदान केंद्रांपर्यंत पोहचून तेथे 90 टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम … The post Loksabha election | नव्वद टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम appeared first on पुढारी.

Loksabha election | नव्वद टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे, तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. आता सर्वांना मिळून कमी मतदान केंद्रांपर्यंत पोहचून तेथे 90 टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
पुण्यातील यशदामध्ये आयोजित स्वीप नोडल अधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरिष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या भूमिका सुरुवातीच्या काळातील नियंत्रक, अंमलबजावणी करणारी संस्था ते आता मतदान जनजागृतीपर्यंत विस्तारल्या आहेत. संविधाननिर्मितीनंतर मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. युरोपातील काही देशांच्या आधीच संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला. या पार्श्वभूमीवर सुशिक्षित नागरिकांच्या मतदानाप्रती उदासीनतेमुळे शहरात कमी मतदान होत आहे.
अजमेरा म्हणाले, मतदानाची टक्केवारी, मतदारांचा सहभाग कमी पडू नये, याला महत्त्व आले आहे. यासाठी त्यातील कमतरता शोधून त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. पुणे जिल्ह्याने स्वीप उपक्रमात खूप चांगले काम केले आहे. आयोगाने शैक्षणिक संस्था, पेट्रोलियम असोसिएशन, डाक कार्यालये, बँक असोसिएशन, नागरी विमान संचालनालय, रेल्वे आदींबरोबर स्वीपसाठी सामंजस्य करार केले असून, जिल्ह्यांनीही मतदार जागृतीचे उपक्रम राबवावेत.
हेही वाचा

कोल्हापूरचा पारा 38.2 अंशांवर किमान तापमानातही वाढ
Baltimore bridge collapse : बाल्टिमोर पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू
पुरंदर तालुका पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात : शिवतारे यांनीही थोपटले दंड

Latest Marathi News Loksabha election | नव्वद टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम Brought to You By : Bharat Live News Media.