‘द गटलेस फूडी’ या नावाने प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा दिड्डेचे पुण्यात निधन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा दिड्डेचे रविवारी (दि. २४) पुण्यात निधन झाले. तिच्या पतीने इन्स्टाग्रामवर निधनाबाबतची माहिती दिली. ‘द गटलेस फूडी’ या नावाने नताशा सोशल मीडियावर प्रसिद्ध होती.
नताशाच्या इंस्टाग्राम बायोनुसार, नताशा दिड्डे एक प्रसिद्ध शेफ होती. तिला पोटाचा आजार असल्याची प्राथमिक माहिती आहे. नताशाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तिच्या पतीने या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “जड अंतकरणाने मला हे सांगत आहे की, माझी पत्नी नताशा डिड्डी उर्फ द गुटलेस फूडी हिचे निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे आमच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे,” त्याने लिहिले.
Latest Marathi News ‘द गटलेस फूडी’ या नावाने प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा दिड्डेचे पुण्यात निधन Brought to You By : Bharat Live News Media.