नगरसूलला रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
नगरसुल (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- नगरसुल-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाईनवर सोमवारी रात्री रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. राजेश रेवाराम (४६, खरगोन, मध्य प्रदेश) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी (दि.२६) सकाळी ट्रॅकमन कर्मचारी ग्रस्त घालत असताना नगरसूलपासून पूर्वेला दोन किमी अंतरावर मृतदेह निदर्शनास आला. येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताच्या खिशात आधारकार्ड, फोन डायरी मिळून आली. त्यावर संपर्क साधल्यानंतर त्याची ओळख पटली. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा :
Tushar Kapoor : तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण , लँड माफियावर चित्रपट
प्रशासन चांदी उद्योजकांच्या पाठीशी राहणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही
Latest Marathi News नगरसूलला रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.