वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा 

वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा 

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– वर्षभरापूर्वी भेटवस्तू खरेदीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणीस पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या भामट्याने तरुणीची पुन्हा चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयित मयंक बांधवारा (रा. हरियाणा) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका परिसरातील रहिवासी २८ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयित मयंक याने जुलै २०२३ ते २५ मार्च २०२४ या कालावधीत ३ लाख ९१ हजार ५० रुपयांचा गंडा घातला. संबंधित तरुणी उच्चशिक्षित असून ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. गत वर्षी तिला भेटवस्तू खरेदीच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली होती. याबाबत तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तरुणीच्याच ओळखीतील संशयित मयांक याच्या लक्षात हा प्रकार आला होता. त्याने तरुणीस फसवणुकीची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली संशयिताने तरुणीकडून ॉनलाइन स्वरुपात पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर संशयिताने तरुणीशी संपर्क कमी केला. तरुणीने पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे तरुणीने संशयितारोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा –

काँग्रेसला विदर्भात पुन्हा धक्का; माजी आमदार नामदेव उसेंडी भाजपात
बारामती : उपकारागृहाच्या उंच भिंतीवरून आरोपीने मारली उडी; रुग्णालयात दाखल
Morambaa Serial : मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री

Latest Marathi News वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा  Brought to You By : Bharat Live News Media.