रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी धरणात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – तालुक्यातील कुसुंबा गावातील तरुणांनी (दि. २५) रोजी धुलिवंदननिमित्त गावात होळी खेळली. त्यातील काही तरुण हे दुपारी १२.३० वाजता पोहण्यासाठी कंडारी-रायपूर शिवारातील वाघूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. यातील रोहित कैलास पाटील वय 18 याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा शोध घेतला.
ही ठिकाणी या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटना सोमवारी (दि. २५) दुपारी घडली. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दि. (२६) रोजी दुपारी १ वाजता मिळून आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित पाटील हा तरूण आपल्या आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता.
हेही वाचा :
CUET-UG – 2024: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
Mumbai Indians in Trouble : मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, सुर्या दुस-या सामन्यातूनही बाहेर
Jalgaon News | जंगलातून अवैधरित्या डिंकाची वाहतूक, वनविभागाची धडक कारवाई
Latest Marathi News रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी धरणात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.