नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह
नांदगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा– नांदगाव तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून, नांदगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती (दि. 25) नांदगाव पोलिसांना समजली. नांदगाव पोलिसांना तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचा आढळून आले.
हा मृतदेह पुरुष जातीचा असून, याचा रंग सावळा आहे. तसेच 30 ते 40 वर्ष वय असल्याचा अंदाज आहे. अंगात आकाश रंगाची फुल बाईचा शर्ट, राखाडी रंगाची फुल जीन्स पॅन्ट, उंची अंदाजे पाच ते साडेपाच फूट असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास नांदगाव पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आव्हान नांदगाव चे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील बडे करत आहे.
हेही वाचा :
प्रशासन चांदी उद्योजकांच्या पाठीशी राहणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही
Lok Sabha Election 2024 | ‘चळवळीला लाचार करण्याचा प्रयत्न मान्य नाही’; आंबेडकरांनी ‘मविआ’ला सुनावले
Stock Market Closing Bell | तीन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद
Latest Marathi News नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.