मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थाने करुन रमा आणि (Morambaa Serial) अक्षयला वेगळे करु पाहणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत लवकरच रेवाचा नवरा … The post मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री appeared first on पुढारी.

मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थाने करुन रमा आणि (Morambaa Serial) अक्षयला वेगळे करु पाहणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एन्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे. (Morambaa Serial)
मुरांबा या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, ‘जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतोय. मुरांबा मालिकेत मी खलनायक साकारणार आहे. खलनायक साकारताना पात्र एका साच्यात अडकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची मुभा असते. शशांक केतकरसोबत मी याआधी काम केलं आहे, त्यामुळे आमची मैत्री होतीच. इतर कलाकारांसोबतही छान गट्टी जमली आहे. मुरांबा मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणता येईल.’
अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं नवं नाट्य घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. मुरांबा दुपारी १.३० वाजता पाहता येईल.
Latest Marathi News मुरांबा मालिकेत नवं वळण; आशय कुलकर्णीची धमाकेदार एन्ट्री Brought to You By : Bharat Live News Media.