तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण , लँड माफियावर चित्रपट

तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण , लँड माफियावर चित्रपट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता तुषार कपूर हा निर्माता प्रेरणा अरोरा हिचा ओटीटी चित्रपट “डंक – वन्स बिटन ट्वाईस शाय” मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. हा अभिनेता अजिंक्य हे पात्र साकारून वकिलाची भूमिका साकारणार आहे. (Tushar Kapoor) तुषार कपूरसाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खास ठरणार आहे. तुषार हा बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि आता या नव्या चित्रपटात तो काय जादू करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. (Tushar Kapoor)
‘डंक’ बद्दल बोलताना प्रेरणा म्हणते, “डंक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट ठरणार आहे. एक समाज म्हणून आपण जमीन बळकावण्याच्या या धोक्याविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे. गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना सशक्त आणि संरक्षण देणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे.

‘DUNK’ ANNOUNCEMENT… Once bitten, twice shy… The bite that changed everything, from venom to victory… #PrernaVArora announces her next #OTT film, titled #Dunk… Featuring #ShivinNarang, #NiddhiAgerwal and #SuchitraKrishnamoorthi.
Directed by #AbhishekJaiswal.#PrernaArora… pic.twitter.com/yDJcAJxdsJ
— taran adarsh (@taran_adarsh) February 24, 2024

उत्तम कथानक आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, राष्ट्रीय विजेते ‘पॅड मॅन’, ‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ यासारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. तुषार कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आदी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘डंक’ व्यतिरिक्त, प्रेरणा अरोरा तेलगू चित्रपट ‘हिरो हिरोईन’ची निर्मिती करत आहे, ज्यात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे.
Latest Marathi News तुषार कपूर ‘डंक’ मधून करणार OTT पदार्पण , लँड माफियावर चित्रपट Brought to You By : Bharat Live News Media.