तीन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी तीन सत्रांतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ३६१ अंकांनी घसरून ७२,४७० वर बंद झाला. तर निफ्टी ९२ अंकांच्या घसरणीसह २२,००४ वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी वाढला. तर बीएसई स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला. बाजारावर आज बँकिंग आणि आयटी सेक्टरमधील शेअर्समुळे दबाव राहिला. तर रियल्टी आणि मेटल क्षेत्रात … The post तीन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद appeared first on पुढारी.

तीन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद

Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी तीन सत्रांतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ३६१ अंकांनी घसरून ७२,४७० वर बंद झाला. तर निफ्टी ९२ अंकांच्या घसरणीसह २२,००४ वर स्थिरावला. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी वाढला. तर बीएसई स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला. बाजारावर आज बँकिंग आणि आयटी सेक्टरमधील शेअर्समुळे दबाव राहिला. तर रियल्टी आणि मेटल क्षेत्रात तेजी राहिली. (Stock Market Closing Bell)
कमकुवत सुरुवातीनंतर, बाजाराचा व्यवहार नकारात्मक झोनमध्ये झाला. ऑईल आणि गॅस, मेटल, कॅपिटल गुड्स आणि रिॲल्टी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे इंट्राडे रिकव्हरी दिसून आली. पण मीडिया, आयटी आणि बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे दोन्ही निर्देशांक घसरून बंद झाले.
क्षेत्रीय आघाडीवर, बँक आणि आयटी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले, तर कॅपिटल गुड्स, रियल्टी, ऑईल आणि गॅस, मेटल निर्देशांक ०.५-१ टक्क्यांनी वधारले.
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, विप्रो, एचडीएफसी बँक, कोटक बँक, इन्फोसिस, कोटक बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर बजाज फायनान्स, एनटीपीसी, एलटी, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

निफ्टीवर पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, आयशर मोटर्स, विप्रो, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांदरम्यान घसरले. तर बजाज फायनान्स, हिंदाल्को, अदानी पोर्टस्, ब्रिटानिया, एनटीपीसी हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले.
निफ्टी बँक आज लाल चिन्हात बंद झाला. निफ्टी बँकमध्ये एचडीएफसी बँक, कोटक बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एयू बँक यांचे शेअर्स घसरले. केवळ पीएनबी, ॲक्सिस, बँक ऑफ बडोदा या शेअर्सनी वाढून व्यवहार केला.
डीमार्टचे शेअर्स सलग सहाव्या सत्रांत वाढले
राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील अव्हेन्यू सुपरमार्ट्स (डीमार्ट) चे शेअर्स सलग सहाव्या सत्रात वाढले. आज सुरुवातीच्या व्यवहारात या शेअर्सने ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. हा रिटेल स्टॉक गेल्या सहा सत्रांमध्ये १३ टक्क्यांनी वाढला आहे. दुपारच्या व्यवहारावेळी हा शेअर्स एनएसईवर ४ टक्के वाढीसह ४,४९७ रुपयांवर होता. (DMart shares)
हे ही वाचा :

अर्थवार्ता- निफ्टीवर ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे? जाणून घ्या टॉप अप SIP म्हणजे काय?

 
Latest Marathi News तीन सत्रांतील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद Brought to You By : Bharat Live News Media.