ठरलं..! पंजाबमध्‍ये भाजप स्‍वबळावर लढणार, अकाली दलाशी युती नाहीच

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्‍यात भाजप स्‍वबळावर लढेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी आज (दि.२६ मार्च) दिली. पंजाबमध्‍ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्यात पुन्हा युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती. ( Lok Sabha polls 2024 ) पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार … The post ठरलं..! पंजाबमध्‍ये भाजप स्‍वबळावर लढणार, अकाली दलाशी युती नाहीच appeared first on पुढारी.

ठरलं..! पंजाबमध्‍ये भाजप स्‍वबळावर लढणार, अकाली दलाशी युती नाहीच

Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्‍यात भाजप स्‍वबळावर लढेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी आज (दि.२६ मार्च) दिली. पंजाबमध्‍ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्यात पुन्हा युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती. ( Lok Sabha polls 2024 ) पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

BJP to contest the Lok Sabha elections alone in Punjab.
ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਲੋਕ ਸਭਾ ਚੋਣਾਂ ਪੰਜਾਬ ਵਿਚ ਇੱਕਲੇ ਲੜਨ ਜਾ ਰਹੀ ਹੈ। pic.twitter.com/FbzfaePNj3
— Sunil Jakhar(Modi Ka Parivar) (@sunilkjakhar) March 26, 2024

२०१९ लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघांमध्‍ये 8 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलास प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. आम आदमी पार्टी (आप) एक जागा मिळाली होती. २०२०मध्‍ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप याच्‍यातील युती संपुष्‍टात आली होती. केंद्र सरकारच्‍या कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)तून बाहेर पडत असल्‍याचे जाहीर केले होते.
शिरोमणी अकाली दलाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आीदंना पाठिंबा दिला आहे. त्‍यामुळे भाजप आणि शिरोमणी अकाली दलात पुन्‍हा युती होईल, अशी चर्चा पंजाबच्‍या राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
The post ठरलं..! पंजाबमध्‍ये भाजप स्‍वबळावर लढणार, अकाली दलाशी युती नाहीच appeared first on Bharat Live News Media.

Go to Source