‘भोजशाळा’चे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या वादग्रस्त भोजशाळा संकुलाचे ( Bhojshala Complex ) सर्वेक्षण शुक्रवार २२ मार्चपासून सुरू झाले आहे. आज ( दि. २६ मार्च) सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे पथक येथे दाखल झाले आहे. २२ मार्चपासून भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. वरिष्ठ स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, या … The post ‘भोजशाळा’चे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु appeared first on पुढारी.
‘भोजशाळा’चे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या वादग्रस्त भोजशाळा संकुलाचे ( Bhojshala Complex ) सर्वेक्षण शुक्रवार २२ मार्चपासून सुरू झाले आहे. आज ( दि. २६ मार्च) सकाळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे पथक येथे दाखल झाले आहे.
२२ मार्चपासून भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. वरिष्ठ स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, या प्रकरणातील याचिकाकर्त्यांपैकी एक आशिष गोयलहेही उपस्‍थित होते. धारचे पोलिस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे की, भोजशाळा संकुलामध्‍ये मंगळवारी ‘पूजा’ आणि शुक्रवारी ‘नमाज’ होईल.

#WATCH | A team of the Archaeological Survey of India (ASI) arrives at Bhojshala Complex in Dhar, Madhya Pradesh to conduct the survey which began on 22nd March
For Hindus, the Bhojshala Complex is a temple dedicated to Goddess Vagdevi (Saraswati), while for Muslims, it is the… pic.twitter.com/D28uQSz9zV
— ANI (@ANI) March 26, 2024

मध्‍य प्रदेशमधील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्‍यास इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने ११ मार्च रोजी परवानगी दिली होती. भोजशाळा संकुलाचे ‘वैज्ञानिक सर्वेक्षण’ सहा आठवड्यांच्या आत करण्याचे निर्देश दिले होते. 7 एप्रिल 2003 रोजी जारी केलेल्या ASI आदेशानुसार, हिंदूंना दर मंगळवारी भोजशाळा संकुलात पूजा करण्याची परवानगी आहे, तर मुस्लिमांना शुक्रवारी त्या ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी आहे.
काय आहे ‘भोजशाळा’ वाद?
धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली हाेती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
इतिहास काय सांगतो?
हजार वर्षांपूर्वी धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोजने येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर ‘भोजशाळा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली.1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली.  ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.
हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.
धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले
1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली.
तणावाच्‍या घटनांमुळे भोजशाळा चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी
12 मे 1997 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी भोजशाळेत सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली. मंगळवारी पूजा करण्यासही बंदी घातली. वसंत पंचमीच्या दिवशीच नमाज आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही बंदी 31 जुलै 1997 रोजी उठवण्यात आली. 6 फेब्रुवारी 1998 रोजी पुरातत्व विभागाने पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशावर बंदी घातली. मंगळवारची पूजाही बंद झाली. 2003 मध्ये पुन्हा मंगळवारी पूजा करण्यास परवानगी देण्यात आली. बँक्वेट हॉलही पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. 2013 मध्ये वसंत पंचमी आणि शुक्रवार एकाच दिवशी पडल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. हिंदूंनी जागा सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी लाठीमार केला. 2016 मध्येही असचा प्रकार घडला होता.
 
 
The post ‘भोजशाळा’चे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु appeared first on Bharat Live News Media.

Go to Source