पैठण : आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पाचोड पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. २५) रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आडुळ गावात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी पोलीस पथकासह गावात भेट देऊन गावात शांतता प्रस्थापित करून सदरील आरोपी अटक करून कारवाई केली आहे.
Latest Marathi News पैठण : आडुळ येथे समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.