नांदेड : शेतीच्या आखाड्यावरुन सोयाबीन चोरले; गुन्हा दाखल 

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या आखाड्यावर झोपलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री सावरखेड येथे घडली. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी या चोरीच्या घटनेने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पिकले नाही म्हणून शेतकरी हैराण असताना आता चोरी करून लुटले. गेल्या काही दिवसात घुंगराळा, … The post नांदेड : शेतीच्या आखाड्यावरुन सोयाबीन चोरले; गुन्हा दाखल  appeared first on पुढारी.
#image_title

नांदेड : शेतीच्या आखाड्यावरुन सोयाबीन चोरले; गुन्हा दाखल 

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या आखाड्यावर झोपलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री सावरखेड येथे घडली. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी या चोरीच्या घटनेने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पिकले नाही म्हणून शेतकरी हैराण असताना आता चोरी करून लुटले.
गेल्या काही दिवसात घुंगराळा, बरबडा, कुंटुर परिसरात चोरीच्या घटनानी डोके वर काढले आहे. अज्ञात चोरट्यांनी घुंगराळा येथील खंडोबा मंदिरात दोन वेळा दरवाज्याचे कुलूप तोडून दान पेट्या फोडून रक्कम पळविल्याची घटना घडली. त्याचबरोबर घुंगराळा येथेही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. यातील एकही चोरीच्या घटनेचा तपास लावण्यात कुंटूर पोलिसांना यश आले नाही. एकीकडे चोरटे पोलिसांना सापडत नाहीत तर दुसरीकडे उद्या कुणाचे घर चोरटे फोडतात अशी भिती निर्माण झाली आहे.
घरे फोडता फोडता आता चोरट्यांनी आपला मोर्चा शेताकडे वळवल्याचे सावरखेड येथील घटनेवरून दिसून येत आहे. कुटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरखेड येथील वयोवृद्ध शेतकरी शेषेराव व्यंकोबा वानखेडे हे 20 नोव्हेंबर रोजी शेतातील आखाड्यावर झोपले असता चार चोरट्यांनी आखाड्यावर वर येऊन सदर शेतकऱ्यांस त्याच्याच गळ्यातील रुमालाने पलंगाला बांधून पत्रात असलेले सोयाबीनचे ७५ हजाराचे सोयाबीनचे २५ पोते काही अंतरावर उभे केलेल्या वाहनात टाकुन घेऊन गेले. या बाबत वयोवृद्ध शेतकरी शेषेराव वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार कुसमे हे करीत आहेत.
हेही वाटलंत का?

Argentina Brazil Fans Clash: हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video)
Argentina Brazil Fans Clash: हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video)

The post नांदेड : शेतीच्या आखाड्यावरुन सोयाबीन चोरले; गुन्हा दाखल  appeared first on पुढारी.

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या आखाड्यावर झोपलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री सावरखेड येथे घडली. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी या चोरीच्या घटनेने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पिकले नाही म्हणून शेतकरी हैराण असताना आता चोरी करून लुटले. गेल्या काही दिवसात घुंगराळा, …

The post नांदेड : शेतीच्या आखाड्यावरुन सोयाबीन चोरले; गुन्हा दाखल  appeared first on पुढारी.

Go to Source