GT vs MI : गुजरातला तिसरा धक्का; उमरझाई १७ धावांवर बाद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील पाचवा सामना आज (दि.२४) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
गुजरातला तिसरा धक्का; उमरझाई १७ धावांवर बाद
अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने गुजरातला तिसरा धक्का बसला. १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने टिळक वर्माच्या हाती झेल दिला. साई सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्याला एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावा करता आल्या. १४ षटकांमध्ये तीन गडी गमावत गुजरातने ११४ धावा केल्या आहेत.
गुजरातला दुसरा धक्का
आठव्या षटकात पियुष चावल्याने शुभमन गिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. शुभमनने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार पटकावत ३१ धावा केल्या.
गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी संघाला चांगील सुरुवात करुन दिली. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने साहा क्लीन बोल्ड केले. त्याने १९ धावा केल्या. पाच षटकांनंतर गुजरातने १ गडी गमावत ४७ धावा केल्या.
आजच्या सामन्यात मुंबई तीन परदेशी खेळाडू टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुड यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे . तर डेव्हिड मिलर, स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई हे गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहेत.
The post GT vs MI : गुजरातला तिसरा धक्का; उमरझाई १७ धावांवर बाद appeared first on Bharat Live News Media.