जेवणाचा डबा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून केला पत्नीचा खून
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्नी फिट येऊन बेशुद्ध पडल्यानंतर पतीने तिला रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिचा खून झाल्याचे सांगताच पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीनेच तिचा खून केल्याचे उघड झाले. डब्बा न दिल्यावरून वाद घालत तिला बेदम मारहाणकरून तिचा खून केल्याची घटना तपासात निष्पन्न झाली आहे. शितल सोमनाथ पांडागळे (वय २७, रा. उंड्री) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सोमनाथ महादेव पांडागळे (वय ३०) याला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ हा बिगारी काम करतो. तर, शितल ही फिरस्ती होती. त्यातून त्यांची ओळख झाली. ओळखीनंतर एका मंदिरात जाऊन त्यांनी विवाह केला होता. ते दोघे भाड्याने खोलीकरून राहत होते. दरम्यान, कामावर जाताना जेवणाचा डब्बा न दिल्यावरून दोघांत वाद झाला. वादानंतर लाकडी बांबूने शितलला मारहाण केली. मारहाणीनंतर काही वेळात तिला फिट आली व ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले. तिच्या अंगावर व्रण दिसून आल्याने डॉक्टरांनी तसा अहवाल दिला. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
The post जेवणाचा डबा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून केला पत्नीचा खून appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्नी फिट येऊन बेशुद्ध पडल्यानंतर पतीने तिला रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिचा खून झाल्याचे सांगताच पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीनेच तिचा खून केल्याचे उघड झाले. डब्बा न दिल्यावरून वाद घालत तिला बेदम मारहाणकरून तिचा खून केल्याची घटना तपासात निष्पन्न झाली आहे. शितल सोमनाथ पांडागळे (वय …
The post जेवणाचा डबा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून केला पत्नीचा खून appeared first on पुढारी.