हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हरसुल-तोरंगण रोडवर सापळा रचून राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने ५९ हजार ५२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कार असा एकूण २ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मद्यसाठा केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्री करता … The post हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई appeared first on पुढारी.

हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हरसुल-तोरंगण रोडवर सापळा रचून राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने ५९ हजार ५२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कार असा एकूण २ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेला मद्यसाठा केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्री करता येतो. मात्र वाहन चालक विलास गालट (२८, रा. पेेठ) याने हा मद्यसाठा जिल्ह्यात आणला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाचे निरीक्षक आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकूर, धीरज जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक विष्णु सानप, जवान संतोष कडलग, अमित गांगुर्डे, रॉकेश पगारे आदींच्या पथकानेे ही कामगिरी केली.
हेही वाचा :

USA : अरुणाचल प्रदेश भारताचा ‘अविभाज्य भाग’, अमेरिकेचे मोठे विधान
Bhojshala : भोजशाळा सर्वेक्षण उद्यापासुन सुरू होणार 
Lok Sabha Election 2024 : मनसेला आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास भाजपचा नकार

Latest Marathi News हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.