Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशबाबत अमेरिकेने मोठे वक्तव्य केले आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेला भारताचे राज्य म्हणून मान्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (दि.२०) सांगितले,”यूएस सरकार अरुणाचल प्रदेशला भारताच्या भूभागाचा एक भाग म्हणून मान्यता देते आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणत्याही “आक्रमण किंवा अतिक्रमण” ला “कडक” विरोध करते.” (USA)
USA : अरुणाचल प्रदेश भारताचा ‘अविभाज्य भाग’
माहितीनुसार, चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वरिष्ठ कर्नल झांग झियाओगांग काही दिवसांपूव्री म्हणाले होते की, झिझांगचा दक्षिण भाग (तिबेटचे चिनी नाव) हा चीनच्या भूभागाचा भाग आहे आणि भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला कधीही मान्य करत नाही. अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणणाऱ्या चीनने भारतीय नेत्यांच्या या राज्याच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. यानंतर काही दिवसांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने अरुणाचल प्रदेशला भारतीय प्रदेश म्हणून मान्यता दिली आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी किंवा अतिक्रमण, लष्करी किंवा नागरी यांच्याद्वारे प्रादेशिक दावे पुढे नेण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना आम्ही ठाम विरोध करतो.
पंतप्रधानांनी ९ मार्चला अरुणाचलला भेट दिली
९ मार्च रोजी पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यात १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. अरुणाचलमधील इटानगर येथे आयोजित ‘विकसित भारत विकसित नॉर्थ ईस्ट’ या कार्यक्रमात त्यांनी याविकास प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी केली. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशात १३,००० फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा राष्ट्राला समर्पित केला होता.
अरुणाचलवरील चीनचा खोटा दावा भारताने सातत्याने फेटाळला आहे…
अरुणाचल प्रदेशवर चीनचा प्रादेशिक दावा भारताने वारंवार नाकारला आहे आणि हे राज्य देशाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. भारतानेही या भागाला ‘काल्पनिक’ नाव देण्याचे बीजिंगचे पाऊल नाकारले आहे, असे म्हटले आहे की यामुळे वास्तव बदलणार नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की त्यांनी चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या अलीकडील विधानांची दखल घेतली आहे ज्यात अरुणाचल प्रदेशच्या भूभागावर करण्यात आले आहेत.
हेही वाचा
South Korean-flagged Tanker : जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू
ब्रेकिंग : फेडरल रिझर्व्हचे व्याजदर जैसे थे; भारतीय शेअर बाजारावर होतील ‘हे’ परिणाम | Fed Rate
South Korean-flagged Tanker : जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू
Latest Marathi News अरुणाचल प्रदेश भारताचा ‘अविभाज्य भाग’, अमेरिकेचे मोठे विधान Brought to You By : Bharat Live News Media.