निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धारदार शस्त्रांनी एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास गुंडा विरोधी पथकाने निलगीरी बाग परिसरातून पकडले आहेे. रोशन काळे उर्फ बाले (२४, रा. जेलरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. संशयित रोशन याच्यासह माँटी काळे, प्रदिप सोनवणे यांनी १० नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगर येथील शेलार मळा … The post निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड appeared first on पुढारी.

निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- धारदार शस्त्रांनी एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास गुंडा विरोधी पथकाने निलगीरी बाग परिसरातून पकडले आहेे. रोशन काळे उर्फ बाले (२४, रा. जेलरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
संशयित रोशन याच्यासह माँटी काळे, प्रदिप सोनवणे यांनी १० नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगर येथील शेलार मळा परिसरात एकावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर रोशन फरार होता. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी रोशनची माहिती संकलित करीत सापळा रचला. त्यास बुधवारी (दि.२०) पथकाने एका देशी पिस्तुल व तीन जीवंत काडतुसांसह पकडले. याप्रकरणी त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा

केंद्राला आणखी एक झटका : ‘फॅक्ट चेकिंग युनिट’ला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती | Fact-check Units
Lok Sabha Election : ही’ निवडणूक ठरली आणीबाणीचे कारण

Latest Marathi News निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.