कोल्हापूर : लोकसभेसाठी १०० टक्के मतदान करा! जिल्हाधिकारी अमोल येडगे

गुडाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षे वयावरील चालू न शकणाऱ्या वृद्ध,दिव्यांग किंवा आजारी व्यक्ती यांच्यासाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येत असून मतदारांनी शंभर टक्के मतदान नोंद करावे असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
खिंडी व्हरवडे ता. राधानगरी येथे लोकसभा मतदान केंद्रांना थेट भेट देऊन पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यावेळी उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने श्री येडगे यांनी बुधवारी दुपारी राधानगरी तालुक्यातील पडसाळी, कसबा तारळे,खिंडी व्हरवडे,आकनुर येथील मतदान केंद्रांना थेट भेटी देऊन मतदान केंद्रांची पाहणी केली. याप्रसंगी तहसीलदार अनिता देशमुख यांनी तालुक्यातील मतदान केंद्रांची, निवडणूक तयारीची माहिती दिली. येडगे यांनी राधानगरी तालुक्यातील प्रशासकीय तयारी बाबत समाधान व्यक्त करून प्रत्यक्ष मतदान दिवशी मतदारांना कोणत्या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून द्यायच्या याबाबत काही सूचना दिल्या.
याप्रसंगी राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसूफ शेख,पोलीस निरीक्षक श्री गुरव, मंडल अधिकारी प्रवीण पाटील, क्षेत्रीय अधिकारी लालासो मोहिते, तलाठी पी आय गुरव,खिंडी व्हरवडेच्या सरपंच कल्पना पाटील, उपसरपंच अजय पाटील, ग्रामसेविका जयश्री चौगले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News कोल्हापूर : लोकसभेसाठी १०० टक्के मतदान करा! जिल्हाधिकारी अमोल येडगे Brought to You By : Bharat Live News Media.
