Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील महागाईचा दर २ टक्के इतका खाली आणण्याचे फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट असल्याने व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे अमेरिकेतील बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील जास्त असल्याने, विकासाचा मुद्दाही फेडरल रिझर्व्हने विचारात घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील व्याजदर ५.२५-५.५०% इतका राहिला आहे. (Fed Rate)
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. गेल्या काही महिन्यात अमेरिकेत महागाईचा दर सातत्याने वाढता राहिल्याने फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सातत्याने वाढ केली होती. अमेरिकेत सध्या गेल्या दोन दशकातील सर्वाधिक व्याजदर राहिलेले आहेत. अमेरिकेतील फेब्रुवारी महिन्यातील महागाईचा दर हा ३.२ टक्के वार्षिक इतका नोंदवला गेला आहे. हा दर ३.१ टक्के इतका खाली येईल असे अपेक्षित होते.
फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी २ टक्के इतका महागाईचा दर अपेक्षित आहे. पण अमेरिकेत बेरोजगारीचा दर गेल्या दोन वर्षांतील सर्वांत जास्त असल्याने फेडरल रिझर्व्हला महागाईवर मात करत विकासावरही भर द्यावा लागणार आहे, असे लाईव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.
फेडरल रिझर्व्हची Federal Open Market Committee व्याजदरासंदर्भात निर्णय घेते. जोपर्यंत महागाई २ टक्केच्या उद्देशापर्यंत जाताना दिसत नाही, तोपर्यंत व्याजदरात कोणतीही कपात न करण्याच्या धोरणावर समिती ठाम आहे.
भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होईल? Fed Rate
फेडरेल रिझर्व्ह व्याजदारात कोणतीही कपात करणार नाही, असे गृहित धरून बाजाराची हालचाल राहिलेली आहे. पण फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष अर्थव्यवस्थेबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल काय बोलतात, काय विश्लेषण करतात, याकडे लक्ष असेल, असे मेहत इक्विटीचे विश्लेषण विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी म्हटले आहे.
फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय या वर्षीच्या मध्यावर घेईल, त्यामुळे बाजारात संमिश्र पडसाद उमटतील. भारतीय बाजारात सध्या अस्थिरता आहे. याचे कारण म्हणजे मीड अँड स्मॉल कॅफ स्टॉक्सचे बाजारमूल्य वाढले आहे, रिटेल गुंतवणूक घटलेली आहे, तसेच निवडणुका तोंडावर आहेत, असे लाईव्ह मिंटने म्हटले.
The US #FederalReserve left the key lending rates unchanged at 5.25%- 5.50% for a fifth straight meeting after a two-day Federal Open Market Committee consultation, despite signs that inflation stayed surprisingly high at the start of the year
Read here: https://t.co/rLR0JWnHbN pic.twitter.com/chhfwSbreF
— Mint (@livemint) March 20, 2024
LIVE NOW: Press conference with #FOMC Chair Powell: https://t.co/1uJrua5qsH and https://t.co/FJa6TbkDMt
— Federal Reserve (@federalreserve) March 20, 2024
US Fed Meet Live Updates: Powell-led FOMC keeps key rates unchanged at 5.25-5.50% for 5th straight meeting
#FOMC pic.twitter.com/yxaqQ6Y9eu
— SAVATAR (@Savatarx0) March 20, 2024
हेही वाचा
Stock Market : वेध शेअर बाजाराचा; सावध ऐका पुढल्या हाका!
India stock market | भारत बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार, हाँगकाँगला मागे टाकले
‘ड्रॅगन’ला मंदीच्या झळा : चिनी शेअर बाजार गडगडला; ३ वर्षांत ६ लाख कोटी डॉलरचे नुकसान | China Stock Market Crash
Latest Marathi News फेडरल रिझर्व्हचे व्याजदर जैसे थे; भारतीय शेअर बाजारावर होतील ‘हे’ परिणाम Brought to You By : Bharat Live News Media.