वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक स्‍पर्धेत सलग दहा विजयांची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारलेली टीम इंडिया विश्‍वचषक जिंकणारच, असा विश्‍वास खेळाडूंसह देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना होता. मात्र रविवार १९ नोव्‍हेंबर रोजी झालेल्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवाचा खोलवर परिणाम टीम इंडियातील खेळाडूंवर झाला आहे. आता संघाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक केएल राहुल … The post वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट appeared first on पुढारी.
#image_title

वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक स्‍पर्धेत सलग दहा विजयांची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारलेली टीम इंडिया विश्‍वचषक जिंकणारच, असा विश्‍वास खेळाडूंसह देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना होता. मात्र रविवार १९ नोव्‍हेंबर रोजी झालेल्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवाचा खोलवर परिणाम टीम इंडियातील खेळाडूंवर झाला आहे. आता संघाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक केएल राहुल याने विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यातील पराभवावर चार दिवसांनी एक ट्विट करत आपल्‍या भावनांना वाट करुन दिली आहे. (KL Rahul’s Emotional Tweet)
still hurts… असे केवळ एका वाक्‍याचे ट्विट करत केएल राहुलने पराभवानंतर चार दिवसांनी आपल्‍या मनातील खंत व्‍यक्‍त केली आहे.

still hurts… 💔 pic.twitter.com/yRb2JPkelP
— K L Rahul (@klrahul) November 23, 2023

फायनलमध्‍ये केएल राहुलने केल्‍या होत्‍या सर्वाधिक धावा
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया याच्‍यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्‍टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेत ऑस्‍ट्रेलियाने टीम इंडियाला २४० धावांमध्ये रोखण्यात यश मिळवले. (KL Rahul’s Emotional Tweet)
पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर

टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाढलाग करताना भारताने ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. मात्र, चौथ्या विकेटसाठी ट्रायव्हस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी मोठी भागीदारी रचली आणि भारताला सामन्यातून बाहेर केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ तर मोहम्मद शमीने १ विकेट पटकावली. (World Cup 2023 Final) या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. त्‍याचबरोबर कोटयवधी भारतीय क्रिकट चाहते निराश झाले हाेते.
हेही वाचा :

World Cup 2023 : “खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना…” भारताच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट चर्चेत
World Cup 2023 : फायनलमधील पराभव लागला जिव्हारी; दोन तरूणांनी संपवले जीवन
Defeat shock World Cup : वर्ल्डकपच्या पराभवाने ३५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 
 
The post वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विश्‍वचषक स्‍पर्धेत सलग दहा विजयांची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारलेली टीम इंडिया विश्‍वचषक जिंकणारच, असा विश्‍वास खेळाडूंसह देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना होता. मात्र रविवार १९ नोव्‍हेंबर रोजी झालेल्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवाचा खोलवर परिणाम टीम इंडियातील खेळाडूंवर झाला आहे. आता संघाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक केएल राहुल …

The post वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट appeared first on पुढारी.

Go to Source