अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण-तळेगाव मार्गावर मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई-घोडेगाव बसला चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळा भागात आग लागली. चालक-वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते बुधवारी (दि. 22) पहाटे दोनच्या दरम्यान … The post अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप appeared first on पुढारी.
#image_title

अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण-तळेगाव मार्गावर मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई-घोडेगाव बसला चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळा भागात आग लागली. चालक-वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते बुधवारी (दि. 22) पहाटे दोनच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
राणूबाईमळा येथील स्थानिक आणि एसटी बसचे चालक आणि वाहक यांनी बसला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून परिसरातून पाणी आणून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण एसटी बस आगीत जळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. प्रशासनाचे एसटीच्या दूरवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
हेही वाचा :

 Pune : शिरूरलगतच्या ग्रामीण भागालाही बिल्डरांचा विळखा
Pune News : महामार्गावरील अडथळे काढणार तरी कधी?

The post अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप appeared first on पुढारी.

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण-तळेगाव मार्गावर मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई-घोडेगाव बसला चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळा भागात आग लागली. चालक-वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 ते बुधवारी (दि. 22) पहाटे दोनच्या दरम्यान …

The post अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप appeared first on पुढारी.

Go to Source