Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक

तळेगाव ढमढेरे: पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात कार चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 21) झाला असून, यामध्ये कारचालक प्रवीण शेषरावजी मोहोड (वय 40 वर्षे, रा. डीएसडी सोसायटी, बुलढाणा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा) हा जखमी झाला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला … The post Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक appeared first on पुढारी.
#image_title

Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक

तळेगाव ढमढेरे: पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात कार चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 21) झाला असून, यामध्ये कारचालक प्रवीण शेषरावजी मोहोड (वय 40 वर्षे, रा. डीएसडी सोसायटी, बुलढाणा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा) हा जखमी झाला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावरून प्रवीण मोहोड हे कार (एमएच 28 एएन 1194) मधून चाललेले असताना पाठीमागून आलेला टेम्पो ( एमएच 12 एसएक्स 2588) ने मोहोड यांच्या कारला पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोहोड यांची कार समोर उभ्या असलेल्या कार ( एमएच 16 बीएच 3460) ला धडकली, तर ही कारदेखील पुढील कंटेनरवर आदळली.
या वेळी मोहोड यांची कार व पुढील कार, कंटेनर व टेम्पो या दोन वाहनांच्या मध्ये अडकली गेल्याने दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. टेम्पोच्या पुढील भागाचे आणि समोरील कंटेनरच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले. या अपघातात कारचालक प्रवीण शेषरावजी मोहोड हे जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो सोडून पळून गेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिस कर्मचारी स्वप्नील गाडेकर यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करत तीनही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतली. शिक्रापूर पोलिस स्टेशन ठाण्यात याबाबत प्रवीण मोहोड यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :

Pune News : अग्निशमन केंद्राचे काम रखडलेलेच !
Pune News : महामार्गावरील अडथळे काढणार तरी कधी?

The post Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक appeared first on पुढारी.

तळेगाव ढमढेरे: पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नगर महामार्गावर कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात कार चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 21) झाला असून, यामध्ये कारचालक प्रवीण शेषरावजी मोहोड (वय 40 वर्षे, रा. डीएसडी सोसायटी, बुलढाणा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा) हा जखमी झाला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला …

The post Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक appeared first on पुढारी.

Go to Source