महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची गरज नाही : शाहू महाराज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही, असे शाहू महाराज यांनी सांगितले. निवडणुकीत किती उमेदवार असतील माहीत नाही; पण सगळे माझे मित्रच आहेत, अशी पुष्टीही त्यांनी न्यू पॅलेस येथे शुक्रवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना जोडली. संभाजीराजे यांनी या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांचीच इच्छा होती म्हणून … The post महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची गरज नाही : शाहू महाराज appeared first on पुढारी.

महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची गरज नाही : शाहू महाराज

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही, असे शाहू महाराज यांनी सांगितले. निवडणुकीत किती उमेदवार असतील माहीत नाही; पण सगळे माझे मित्रच आहेत, अशी पुष्टीही त्यांनी न्यू पॅलेस येथे शुक्रवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना जोडली.
संभाजीराजे यांनी या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांचीच इच्छा होती म्हणून आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगत शाहू महाराज म्हणाले, काय होणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता पहिला मेळावा झाला आहे. मेळाव्यातून लोकांचे मत समजते, त्यातून दिशा समजते. मी कोणत्या चिन्हावर लढणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे. लोकशाहीत निवडणूक बिनविरोध करणे चुकीचे आहे, असे सांगत या निवडणुकीतही दोन-तीन, असे कितीही उमेदवार असू शकतात. ते सर्वजण माझे मित्रच असतील. पण, महायुतीचा उमेदवार कोण असणार, याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही.
संभाजीराजे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत आपण असला तरी तुमचे छत्रपती घराण्यावरील प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमापोटी आज पुन्हा तुम्ही एकत्र आला आहात. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शाहू महाराज हे उमेदवार असतील हे निश्चित आहे. यामुळे आता प्रत्येकाला काम करावे लागेल. त्याचे नियोजन करा. कामाच्या जबाबदार्‍या आणि भाग वाटून घ्या. दिलेल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. मतदान होईपर्यंत लक्ष्यापासून विचलित होऊ नका.
कोल्हापूरकडे यापूर्वी माझे तसे दुर्लक्षच झाले, याबद्दल कोल्हापूरवासीयांची माफी मागतो, असे सांगत यापुढे आता असे होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू. स्वराज्य पक्षाचा गट लोकसभा निवडणूकीपासून ग्रापंचायत निवडणूकीपर्यंत सर्वत्र कार्यरत राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Marathi News महायुतीचा उमेदवार कोण, याचा विचार करण्याची गरज नाही : शाहू महाराज Brought to You By : Bharat Live News Media.