काळजी घ्या ! विदर्भाला गारपिटीचा तर उर्वरित राज्यात उष्णतेचा इशारा

पुणे : तामिळनाडू ते विदर्भ या भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भाला रविवार (दि. 16) ते मंगळवार (दि. 19 मार्च) पर्यंत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात पावसाची शक्यता कमी असून, उष्णतेची लाट अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात, पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा आणि … The post काळजी घ्या ! विदर्भाला गारपिटीचा तर उर्वरित राज्यात उष्णतेचा इशारा appeared first on पुढारी.

काळजी घ्या ! विदर्भाला गारपिटीचा तर उर्वरित राज्यात उष्णतेचा इशारा

पुणे : तामिळनाडू ते विदर्भ या भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भाला रविवार (दि. 16) ते मंगळवार (दि. 19 मार्च) पर्यंत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात पावसाची शक्यता कमी असून, उष्णतेची लाट अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात, पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा आणि विदर्भ ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे.
यात पूर्वोत्तर भारत, हिमालय, काश्मीर, पूर्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा समावेश आहे. विदर्भात 16 ते 19 मार्च असे चार दिवस गारपीट अन् पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात ऊन आणि पाऊसही एकीकडे विदर्भाला गारपीट अन् पावसाचा इशारा, तर दुसऱ्या बाजूला तेथे उष्णतेची लाटही सक्रिय आहे. शुक्रवारी यवतमाळचा पारा राज्यात सर्वाधिक 39.5 अंशांवर गेला होता. त्यापाठोपाठ चंद्रपूर, बह्मपुरी, वर्धा ही शहरे तापली आहेत. मात्र, काही भागांत कमाल तापमान 36 अंशांवर स्थिर आहे.
हेही वाचा

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज
WPL : मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये
बोरीवली-ठाणे बोगदा म्हणजे पैसे खाण्याचे कुरण : जितेंद्र आव्हाड

Latest Marathi News काळजी घ्या ! विदर्भाला गारपिटीचा तर उर्वरित राज्यात उष्णतेचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.