चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : संविधान विरोधी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीत सहभागी झाली आहे. मात्र काँग्रेस राजकारणाचा अनुभव नसलेल्यांना लोकसभा उमेदवारी देत असेल तर, आम आदमी पार्टी याचा विरोध करेल आणि अन्य घटक पक्षांना सोबत घेऊन चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी दाखल करेल, असा इशारा आम आदमी पार्टीचे नेते सुनिल मुसळे यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असले तरी, भाजपाच्या विरोधात मिळमिळीत भूमिका घेत असल्याचे दोन्ही अधिवेशनातून दिसून आले आहे. भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात सहभागी होतील, असा दावा केला होता. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा नेहमीच चालत आहे. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवारांच्या मुलीला काँग्रेसने उमेदवारी दिल्यास भविष्यात काँग्रेसला व इंडिया आघाडीला निश्चितच धोका होवू शकतो, असे मुसळे यांनी यावेळी सांगितले.
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात सध्या मोदी विरोधात लाट आहे, इंडिया आघाडीला चांगली संधी आहे. अशा परिस्थितीत भाजपाला लाभ व्हावा, यासाठी शिवानी वडेट्टीवार सारख्या कमजोर उमेदवारास काँग्रेसने निवडणूकीत उभे करू नये, जर उमेदवारी दिली तर आम आदमी पार्टी याचा ताकदीने विरोध करेल, असेही मुसळे यांनी स्पष्ट केले. या अगोदर आम आदमी पार्टीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात दोन लाखापेक्षा अधिकची मते आम आदमी पक्षाला मिळाली होती. आम आदमी पार्टीचा झाडू हा घराघरात पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
नागपूर : रामटेकच्या गडावर कुणाचा दावा ? बावनकुळे म्हणाले….
‘दक्षिण मुंबई’साठी अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर, उद्धव ठाकरेंची घोषणा
Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत लवकरच मोठा निर्णय: आमदार रवी राणा
Latest Marathi News काँग्रेसने भाजपाविरोधात कमजोर उमेदवार दिल्यास ‘आप’ चा उमेदवार उभा राहील : सुनिल मुसळे Brought to You By : Bharat Live News Media.