ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या आयएसपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमबाहेर मोठा गदारोळ घातला. सुरक्षा रक्षकांना न जुमानता क्रिकेटप्रेमी प्रवेशद्वारावरून उड्या टाकत स्टेडियममध्ये शिरले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे टेनिस व क्रिकेट स्पर्धेचे ६ मार्च ते १५ मार्च दरम्यान आयोजन करण्यात … The post ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज appeared first on पुढारी.

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या आयएसपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमबाहेर मोठा गदारोळ घातला. सुरक्षा रक्षकांना न जुमानता क्रिकेटप्रेमी प्रवेशद्वारावरून उड्या टाकत स्टेडियममध्ये शिरले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे टेनिस व क्रिकेट स्पर्धेचे ६ मार्च ते १५ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी मुंबई व कोलकत्ता या संघांविरुद्ध रंगला. या सामन्यासाठी क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सेफ अली खान या सिनेकलाकारांनी हजेरी लावली. शुक्रवारी अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर अभूतपूर्व गर्दी झाली होती. तर मॅच आणि सिने कलाकारांना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमच्या बाहेरही प्रचंड गर्दी केली. सामन्याचे पासेस असूनही सुरक्षा रक्षकांनी प्रवेश न दिल्याने प्रेक्षकांनी सुरक्षा रक्षकांना न जुमानता गेट क्र. ३ वरून स्टेडियममध्ये उड्या टाकल्या. स्टेडियममध्ये बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे इथून गर्दी कमी करावी, अशा सूचना पोलीस लाऊड स्पीकरद्वारे वारंवार देत होते, मात्र जमलेल्या गर्दीने बेरिगेटही तोडून गोंधळ घातल्याने शेवटी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रण बाहेर गेली व त्यांनी सौम्य लाठी चार्ज करत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम बाहेरील रस्ता, ठाणे बाजारपेठ, स्टेशन परिसर, जांभळी नाका, तलाव पाळी परिसर, कोर्ट नाका येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये ठाणे बाजारपेठेत एक रुग्णवाहिका अडकली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करीत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.
Latest Marathi News ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ; पोलिसांचा लाठीचार्ज Brought to You By : Bharat Live News Media.