पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36 टक्के पेरण्या पूर्ण

पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36 टक्के पेरण्या पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हेक्टर असून त्यापैकी 82 हजार 930 हेक्टरवरील म्हणजे 36 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी पिकाची 49 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झालेल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
जिल्ह्यातील काही तालुक्यातील भाताची काढणी सुरु झाली आहे. तर काही भागातील भात काढणी अद्याप सुरु व्हायची आहे. दिवाळीनंतर भात काढणीस वेग येण्याची अपेक्षा आहे. उसाच्या तोडणीनंतरही शेतकरी गव्हाच्या पेरणीस प्राधान्य देतात. तसेच आंतरपिक म्हणून अन्य पिकेही घेत असतात.
चालूवर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे गव्हाऐवजी हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे. तुलनेने ज्वारीच्या पेरणीने चांगला वेग घेतलेला आहे. पाणी उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकर्‍यांनी चारा पिकास प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे मक्याची सर्वाधिक म्हणजे 62 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झालेली आहे. त्या खालोखाल ज्वारीची 49 टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तालुकानिहाय एकूण पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : हवेली 483, मुळशी 126, भोर 2288, मावळ 102, जुन्नर 4091, खेड 11137, आंबेगांव 6628, शिरुर 13019, बारामती 23809, इंदापूर 6549, दौंड 3393, पुरंदर 11308, वेल्हा पेरणी अहवाल प्राप्त नाही.
हेही वाचा :

पुणे : जुन्नर तालुक्यात भाताचे उत्पादन घटणार
पुणे : समाविष्ट गावांतील जीएसटीच्या उत्पन्नापासून महापालिका वंचित

The post पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36 टक्के पेरण्या पूर्ण appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हेक्टर असून त्यापैकी 82 हजार 930 हेक्टरवरील म्हणजे 36 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी पिकाची 49 टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झालेल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. जिल्ह्यातील …

The post पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांच्या 36 टक्के पेरण्या पूर्ण appeared first on पुढारी.

Go to Source