राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत(शिंदे गट) अनेक पक्षातील मोठे नेते आमच्या संपर्कात असून सोमवापर्यंत राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी(दि.15) पत्रकार परिषदेत केले. शुक्रवारी आमदार शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की छत्रपती संभाजीनगर जागा मिळाल्यानंतर उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या बरोबरच इतर विषयावर … The post राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट appeared first on पुढारी.

राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेनेत(शिंदे गट) अनेक पक्षातील मोठे नेते आमच्या संपर्कात असून सोमवापर्यंत राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी(दि.15) पत्रकार परिषदेत केले.
शुक्रवारी आमदार शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की छत्रपती संभाजीनगर जागा मिळाल्यानंतर उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या बरोबरच इतर विषयावर भाष्य करत येत्या सोमवार पर्यंत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे.अनेक पक्षातील मोठे नेते संपर्कात असून सोमवार पर्यंत चित्र स्पष्ट होईल. हाच राजकीय भूकंप लोकसभेचे चित्र ठरवणार असल्याचे भाकित करून लोकसभेत महायुतीच सरस ठरणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
आंबेडकर इतर पर्याय निवडतील
महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत आंबेडकरांना बोलावले नाही. यातच सर्व काही आले. अॅड. आंबेडकर स्वबळावर लढतील किंवा दुसरा पर्याय निवडतील. आमच्याकडे जागा फुल्ल असल्याने त्यांच्यासोबत आमची बैठक होणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एमआयएमचे अस्तित्व संपले
एमआयएम पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपले आहे. ते लंढले तरी कोणत्याही परस्थितीत ते निवडून येणार नाहीत. ते केवळ मते पळवण्याचे काम करणार आहेत. त्याचा परिणाम आमच्यावर काहीच होणार नसल्याचेही आमदार शिरसाट यांनी सांगितले.
असीम सरोदे नवीन पक्षप्रमुख
संजय राऊतच्या बडबडीत सगळे विषय संपले आहेत. महणून शिवसेना उबाठा गटाने आता असीम सरोदे हा नवीन माणूस नेमला असून तेच सध्या पक्ष प्रमुखांची भूमिका बजावत असल्याची टोला पत्रकार परिषदेत लगावला.
Latest Marathi News राज्यात लवकरच राजकीय भूकंप : संजय शिरसाट Brought to You By : Bharat Live News Media.