आमदार अपात्रता सुनावणी : व्हिपच्या मुद्द्यावरून प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाचे प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांची पहिल्या दिवशी सुरू झालेली उलटतपासणी आजही चालू राहिली. शिंदे गटाच्या वकिलांकडून केले जाणारे तिरकस प्रश्न आणि त्यांना प्रभू यांच्याकडून सावध पण गोल, गोल उत्तरे असेच काहीसे चित्र विधान भवनात होते. … The post आमदार अपात्रता सुनावणी : व्हिपच्या मुद्द्यावरून प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.
#image_title

आमदार अपात्रता सुनावणी : व्हिपच्या मुद्द्यावरून प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाचे प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांची पहिल्या दिवशी सुरू झालेली उलटतपासणी आजही चालू राहिली. शिंदे गटाच्या वकिलांकडून केले जाणारे तिरकस प्रश्न आणि त्यांना प्रभू यांच्याकडून सावध पण गोल, गोल उत्तरे असेच काहीसे चित्र विधान भवनात होते. त्यामुळे ‘याच गतीने सुनावणी चालू राहिली तर संपूर्ण प्रकरणाची सुनावणी वेळेत पूर्ण करणे अवघड होईल’, अशा हताशपणे विधानसभाध्यक्ष नार्वेकरांनी नाराजी व्यक्त केली. (MLA Disqualification Hearing)
आमदार अपात्रता सुनावणीत आज सुनील प्रभू यांची उलट तपासणी चालू राहिली. सुनावणी दरम्यान साक्षीतील कोणत्या बाबी पटलावर नोंदविल्या गेल्या, हे स्पष्ट दिसावे म्हणून आज नवीन स्क्रीन लावण्यात आला होता. तसेच मंगळवारी इंग्रजी भाषेतील याचिकेवरून झालेल्या वादानंतर अनुवादकही नियुक्त करण्यात आले होते. आज दुसर्‍या दिवशीही शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी तिरकस प्रश्न विचारत आमदार प्रभूंना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र प्रभू यांनीही अत्यंत शिताफीने आणि चलाखीने जेठमलानी यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या उलटतपासणीत आपल्या उत्तरातून वकील जेठमलानी यांना हवे असलेले, अपेक्षित मुद्दे लागणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेत प्रभू उत्तरे देत होते.
वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न करूनही आमदार प्रभू यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने अखेर जेठमलानी संतापले. लांबणारी साक्ष पाहता सुनावणी वेळेत कशी संपणार, असा प्रश्न विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केला. मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसांचा कालावधी आहे. या गतीने सुनावणी पुढे जात असेल तर संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल, असे ते म्हणाले.
शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी व्हिपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंना प्रश्न करत घेरण्याचा प्रयत्न केला
महेश जेठमलानी : 21 जून 2022 च्या पत्राकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. हे पत्र कोणाच्या अधिकारात देण्यात आले?
सुनील प्रभू : विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काहीआमदार ट्रेस होत नव्हते, संपर्कात नव्हते म्हणून हे पत्र देण्यात आले. प्रतोद म्हणून मी या बैठकीचा व्हिप दिला होता.
जेठमलानी : आपण हा व्हिप स्वतःच्या अधिकारात काढला होता, असे म्हणणे योग्य ठरेल?
प्रभू : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मत विभाजनानंतर शिवसेना पक्षाचे काही आमदार मिसिंग होते. त्यामुळे पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार बैठक बोलावण्यात आली. त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रतोद म्हणून मी व्हिप बजावला.
जेठमलानी : पक्षप्रमुख यांनी आपल्याला लिखित स्वरूपात सूचना केली होती का?
प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे. मला आठवत नाही लिखित सूचना दिली होती की नाही.
जेठमलानी : आपण गोल गोल फिरवू नका. लिखित सूचना केल्या की नाही?
प्रभू : मी काही गुन्हेगार नाहीये, अशा बैठका जेव्हा तातडीने बोलवल्या जातात, तेव्हा टेलिफोनिक आदेश दिले जातात.
जेठमलानी : जेव्हा यिा सूचना तुम्हाला पक्ष प्रमुखांनी दिल्या तेव्हा तुम्ही कुठे होता?
प्रभू : तेव्हा मी विधान भवनात होतो. पक्ष कार्यालयात त्यावेळी आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी तातडीची बैठक बोलवा, असा पक्षाप्रमुखांचा फोन होता.
जेठमलानी : विधान परिषद मतमोजणीची तारीख काय होती प्रभू?
प्रभू : मला ही तारीख आठवत नाही, ती रेकॉर्डवर आहे. माझ्या माहितीनुसार 20 तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता पुन्हा मतमोजणी झाली होती. त्यामुळे उशीर झाला असे मला वाटते.
जेठमलानी : आपण कोणत्या वेळी व्हिप बजावला हे आठवते का?
प्रभू : मतमोजणी झाली होती. मत विभाजन कुठे झाले हे कागदावर मांडत चर्चा करत होतो. यामध्ये एक – दीड तास गेला. आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे रात्री साडेदहा किंवा साडेअकराच्या दरम्यान मी व्हिप बजावला. पक्ष कार्यालयात पक्षप्रमुखांचा फोन आला. त्यांनी सर्व आमदारांची बैठक बोलवा, असे सांगितले. त्यानुसार मी व्हिप तयार केला.
जेठमलानी : मला स्पेसिफिक उत्तर द्या. मला बॅकग्राऊंड नको आहे. तुमच्यासोबत आमदार कोण होते? जेव्हा तुम्ही व्हिप जारी केला.
प्रभू : हे रेकॉर्डवर आहे.
जेठमलानी : या सगळ्यावर हेच उत्तर हे देत आहेत.
अध्यक्ष : तुम्ही प्रतिज्ञापत्र जरी दिले असले आणि हे रेकॉर्डवर जरी असले तरी या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्यासाठी साक्ष नोंदवली जात आहे.
प्रभू : व्हिप बजावला त्यावेळी मला आमदारांसोबत कोण होते हे आठवत नाही.
देवदत्त कामत (ठाकरे गटाचे वकील) : यावर आम्ही आक्षेप घेतो. प्रतिज्ञापत्रात हे लिहिले, तुम्हाला जर ते आठवत नसेल तर तुमची स्मरणशक्ती तपासली जाते आहे का?
जेठमलानी : प्रभू स्वतः आधीच म्हणाले प्रतिज्ञापत्रात जे लिहिले आहे तेच मी इथे बोलणार आहे. आपण आपले प्रतिज्ञापत्र दाखवा आणि त्यातून सोबत कोण आमदार होते हे सांगा.
अध्यक्ष : तुम्ही उत्तर देताना इतके बॅक ग्राऊंड सांगू नका, स्पेसिफिक उत्तर द्या.
प्रभू : मी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला उशीर का लागला हे सांगायचं आहे. जे आमदार संपर्कात येत होते त्यांना व्हिप देण्यास सुरुवात केली होती त्यात रात्री जवळपास 12 वाजले.
जेठमलानी : तुम्ही म्हणताय की लिखित व्हिप 20 तारखेला रात्री बजावला आहे. पण त्या व्हिपवर 21 जून तारीख नोंदवली आहे हे खरे आहे का?
प्रभू : मी आधीच सांगितलं की व्हिप जारी केला तेव्हा रात्री साडेअकरा- बारा वाजले होते. त्यामुळे मी व्हिपवर 21 जूनची तारीख टाकली. कारण, 20 जून हा दिवस संपला होता. त्यामुळे 21 तारीख व्हिपवर टाकून तो बजावायला सुरुवात केली.
जेठमलानी : तुम्ही व्हिप बजावत होता म्हणजे कशाप्रकारे तो बजावला? तो कसा वाटप केला? कोणत्या प्रकारे वाटप केला?
प्रभू : माझ्या सोबत जे आमदार उपस्थित होते त्यांना तत्काळ दिला. जे आमदार निवासात होते त्यांना व्हिप पाठवून सुपूर्द केला. परंतु जे ट्रेस होत नव्हते त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता.
जेठमलानी : 20 तारखेला तुम्ही ज्या सर्व आमदारांना व्हिप दिला त्यांना व्हिप पोहोचल्याची लिखित पोच घेतली का ?
प्रभू : ज्यांना प्रत्यक्ष व्हिप दिला त्यांची लेखी पोच माझ्याकडे आहे.
……….
दुपारच्या जेवणानंतर सुनील प्रभूंची उलट तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली.
जेठमलानी : 21 जूनला जारी केलेल्या व्हिपवर आपली स्वाक्षरी आहे का?
प्रभू : मी सुनील प्रभू माझी खोटी सही कशी करेल, कोण करेल?
जेठमलानी : 21 जूनला जारी केलेल्या व्हिपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञापत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळी दिसते. आपल्या दोन स्वाक्षरी आहेत का?
प्रभू : हो, माझ्या दोन सह्या आहेत. मी पूर्ण सही करताना एस.डब्ल्यू. प्रभू अशी करतो आणि शॉर्टमध्ये एसपी अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हिप म्हणून आतापर्यंत ज्या सह्या केल्या आहेत त्या सारख्या आहेत.
जेठमलानी : 21 जून 2022 आधी आपण किती लिखित व्हिप जारी केले आहेत?
प्रभू : मला जे स्मरणात आहे त्यानुसार या कार्यकाळात दोन निवडणुका लागल्या. एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हिप मी यापूर्वी जारी केले आहेत.
जेठमलानी : आपण मूळ व्हिप जो बजावला त्याचा दस्तावेज कुठे होता? आपल्या कस्टडीमध्ये होता का?
प्रभू : माझ्याकडे होता. पक्षाची कागदपत्रे ज्या ठिकाणी ठेवतो तिथे हा व्हिप ठेवला होता.
जेठमलानी : 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का?
प्रभू : सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते.
जेठमलानी : जर सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी निवडणुकीत मतदान केले तर ते कोणते आमदार मिसिंग होते असे तुम्ही म्हणताय?
प्रभू : सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते हे जर चेक करायचे असेल तर विधान भवनाच्या पटलावर हे दिसून येईल. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बर्‍याच आमदारांचे फोन बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरात दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या.
जेठमलानी : मी स्पेसिफिक विचारत आहे की कुठले आमदार मिसिंग होते? हे सगळं सांगायची गरज नाही.
अध्यक्ष : तुम्ही प्रभू आम्हाला सांगा की, मिसिंग झालेले आमदार कोण होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही म्हणताय की, आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या.
प्रभू : मी ज्यांना प्रत्यक्ष हातात व्हिप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. त्यांना व्हिप पाठविणे आवश्यक होते. रात्रीपासून ते बैठकीपर्यंत मी व्हिप देण्याचा प्रयत्न करत होतो.
विधानसभा अध्यक्ष : कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत. ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाही. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तरे दिली तर वेळ जास्त लागणार नाही.
प्रभू : जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारत असतील तर मला तशी उत्तरे द्यावे लागतील. त्यामुळे यातून मला संरक्षण द्या ! त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत. त्यामुळे मला अशी उत्तरे द्यावी लागणार.
जेठमलानी : मी त्यांना एवढेच विचारतोय की मिसिंग आमदार कोण होते? तर ते उत्तर फिरून देताय. मला मिसिंग आमदारांची नावे सांगा.
प्रभू : जे 21 तारखेच्या बैठकीला गैरहजर होते ते आमदार मिसिंग होते. बैठकीनंतरसुद्धा आम्ही दोन-अडीच तास वाट पाहिली तरी ते आले नाहीत. त्यांना मी मिसिंग समजतो. कारण काही जणांना व्हिप गेला नसेल, काही कारणास्तव ते रेंजमध्ये नसतील, आजारी असतील म्हणून आम्ही बैठकीपर्यंत वाट पाहिली.
विधानसभा अध्यक्ष : जेठमलानी यांनी तुम्हाला मिसिंग आमदारांची नावे विचारली आहेत, ती सांगा.
प्रभू : मला नावे पाहून सांगावी लागतील. जे बैठकीला गैरहजर होते ते मिसिंग होते.
जेठमलानी : 20 जूनला जो व्हिप जारी झाला तो मूळ व्हिप हा आपल्याकडून तयार करण्यात आला नव्हता. यावर आपले काय म्हणणे आहे?
प्रभू : हे पूर्णपणे चुकीचे आहे.
जेठमलानी : जेव्हा तुम्ही मूळ व्हिप पाठवता तेव्हा त्याच्यावर पाठवणार्‍या सदस्यांचे नाव नसते का?
प्रभू : पाठविणार्‍याचे नाव नसते. तो पक्षादेश असतो.
(MLA Disqualification Hearing)
The post आमदार अपात्रता सुनावणी : व्हिपच्या मुद्द्यावरून प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ठाकरे गटाचे प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांची पहिल्या दिवशी सुरू झालेली उलटतपासणी आजही चालू राहिली. शिंदे गटाच्या वकिलांकडून केले जाणारे तिरकस प्रश्न आणि त्यांना प्रभू यांच्याकडून सावध पण गोल, गोल उत्तरे असेच काहीसे चित्र विधान भवनात होते. …

The post आमदार अपात्रता सुनावणी : व्हिपच्या मुद्द्यावरून प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Go to Source