जळगावात अवकाळीची शक्यता; पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीत मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हयात पावसाची शक्यता असल्याने कापूस, मका, ज्वारी, इत्यादी काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी,
तसेच उघड्यावरील धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे, पावसापूर्वी शक्य झाल्यास कापूस बोडांची वेचणी पूर्ण करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव अधिक असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला व हवामानाचा पुर्वानुमानाकरिता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा, तसेच मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
हेही वाचा :
जळगाव : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे झोपा काढा आंदोलन
नांदेड: कापूस वेचणाऱ्या महिलेची छेड काढणाऱ्या लाईनमनविरूद्ध गुन्हा दाखल
IFFI Goa : मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची इफ्फीत हवा
The post जळगावात अवकाळीची शक्यता; पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन appeared first on पुढारी.
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीत मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हयात पावसाची शक्यता असल्याने कापूस, मका, ज्वारी, इत्यादी काढणी केलेल्या पिकांची …
The post जळगावात अवकाळीची शक्यता; पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन appeared first on पुढारी.