विकासाच्या नावावर यापूर्वी निव्वळ धूळफेक : पंतप्रधान मोदी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : निवडणुका आल्या की यापूर्वी विकासाच्या नावावर केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक होत होती, अशी जोरदार टीका आधीच्या काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारवर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी मी वेगाने धावत आहे आणि देशालाही त्याच वेगाने पुढे नेत आहे, अशा शब्दांत देशाला रविवारी आश्वस्त केले. देशातील विमानतळांचा विकास वेगाने होत आहे. यामुळे … The post विकासाच्या नावावर यापूर्वी निव्वळ धूळफेक : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.

विकासाच्या नावावर यापूर्वी निव्वळ धूळफेक : पंतप्रधान मोदी

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणुका आल्या की यापूर्वी विकासाच्या नावावर केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक होत होती, अशी जोरदार टीका आधीच्या काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारवर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी मी वेगाने धावत आहे आणि देशालाही त्याच वेगाने पुढे नेत आहे, अशा शब्दांत देशाला रविवारी आश्वस्त केले.
देशातील विमानतळांचा विकास वेगाने होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विमान प्रवास सहज आणि सुलभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. कोल्हापूरची विमानसेवा आणि विमानतळ आणखी विस्तारणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आझमगड (उत्तर प्रदेश) येथील कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी कोल्हापूरसह पुणे, अलीगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, आदमपूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन टर्मिनलचे तर कडप्पा, हुबळी, बेळगावी येथील टर्मिनल भवनचे भूमिपूजन केले. यावेळी हे विकासाच्या आनंददायी यात्रेचे अभियान आहे. याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, समरजित घाटगे आदी उपस्थित होते.
विकसित भारतासाठी मी वेगाने धावत आहे आणि देशालाही त्याच वेगाने पुढे नेत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, निवडणुका आल्या की यापूर्वी केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक होत होती. घोषणा केल्या जात होत्या. काही घोषणा संसदेतूनही होत होत्या. अनेक योजनांच्या कोनशिला उभारल्या. मात्र त्याही गायब झाल्या आणि त्या उभारणारे नेतेही गायब झाले. जी विकासकामे 30 वर्षांपूर्वी व्हायला हवी होती, ती आता आम्ही करत आहोत. स्वच्छ उद्देश आणि इमानदारीने ही कामे करत आहोत म्हणूनच देशाचा विकास वेगाने होत आहे.
कोल्हापूर विमानतळावर झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असे मत व्यक्त केले. या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक 64 एकर जागा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी राहील. विमानतळाकडे येणार्‍या रस्त्यासाठी तसेच विमानतळाभोवतालच्या गावांसाठी कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाईल.
खा. महाडिक म्हणाले, ऐतिहासिक लूक आणि आधुनिक असे कोल्हापूरला साजेशी विमानतळाची इमारत झाली आहे. वर्षभरातच हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होईल, यासाठी आपला प्रयत्न आहे. बंद असलेले विमानतळ सुरू केले. ते विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झालेल्याचे आत्मिक समाधान आहे. खा. मंडलिक म्हणाले, एकमेकांच्या आडवे न येता, एकमेकांच्या हातात हात घालून कोल्हापूरच्या विकासासाठी काम करू. स्पर्धा मागे खेचण्याची नको, तर कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याची असेल. सामूहिक प्रयत्नांनी विमानतळाचा विकास झाला. यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळेल, असे खा. माने म्हणाले, टर्मिनस इमारतीने विमानतळाचे रूपच पालटून गेले आहे. कोल्हापूरकरांचे स्वप्न सकार होत आहे. विमानतळ प्राधिकरणाचे पीयूष श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकात 256 कोटी रुपये विमानतळ विकासासाठी खर्च केल्याचे सांगत भविष्यात विमानतळावरून प्रवासी संख्या वाढेल, असे सांगितले.
माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, विमानतळ प्राधिकरणाचे दिलीप सजनानी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ संचालक अनिल शिंदे आदिसह उद्योग, व्यापार, राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Latest Marathi News विकासाच्या नावावर यापूर्वी निव्वळ धूळफेक : पंतप्रधान मोदी Brought to You By : Bharat Live News Media.