‘भाजयुमो’चे कुणाल मराठे यांची प्रदेश सचिव पदावरुन उचलबांगडी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी सोशल मिडीयावरुन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षात नसलेल्या एका इच्छुकास आपल्या पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. हा पक्षविरोधी प्रकार असल्याने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी पत्रक काढत मराठे यांच्या पदाला रविवारी (दि.१०) तात्काळ स्थगिती दिली … The post ‘भाजयुमो’चे कुणाल मराठे यांची प्रदेश सचिव पदावरुन उचलबांगडी appeared first on पुढारी.
‘भाजयुमो’चे कुणाल मराठे यांची प्रदेश सचिव पदावरुन उचलबांगडी

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी सोशल मिडीयावरुन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षात नसलेल्या एका इच्छुकास आपल्या पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. हा पक्षविरोधी प्रकार असल्याने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी पत्रक काढत मराठे यांच्या पदाला रविवारी (दि.१०) तात्काळ स्थगिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. जसजसा हा कालावधी जवळ येत आहे. तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात राज्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. लवकरच राज्याची यादी जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. यातील एका नावाचा उल्लेख करीत भाजयुमोचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी सोशल मिडीयावरुन व्हिडीओ व्हायरल केला. हा पक्षाविरोधी प्रकार असल्याचे सांगून भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष लोणीकर यांनी हा निर्णय घेतला.
हेही वाचा :

Maharashtra politics : ठाकरे गटाला धक्का : आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Lok Sabha election : शत्रुघ्न सिन्हा ते किर्ती आझाद…: जाणून घ्‍या ‘तृणमूल’च्‍या यादीतील चर्चेतील चेहरे
Hasan Mushrif On A. Y. Patil: ए.वाय. पाटील यांनी राजकीय आत्मघात करुन घेतला : हसन मुश्रीफ 

 
Latest Marathi News ‘भाजयुमो’चे कुणाल मराठे यांची प्रदेश सचिव पदावरुन उचलबांगडी Brought to You By : Bharat Live News Media.