छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेविकेच्या मुलाला मारहाण; पोलिसांवर आरोप

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैशावरुन सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेविकेच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेबाराच्या सुमारास गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर चौकात घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (दि.११) दुपारी न्यायालयाने विशाल … The post छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेविकेच्या मुलाला मारहाण; पोलिसांवर आरोप appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेविकेच्या मुलाला मारहाण; पोलिसांवर आरोप

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पैशावरुन सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेविकेच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेबाराच्या सुमारास गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर चौकात घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (दि.११) दुपारी न्यायालयाने विशाल रामराव गायके याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गायके कुटुंबियांनी केला आहे.
गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर चौकात असलेल्या एका चहा टपरीजवळ अक्षय बिषणसिंग राजपूत आणि पियूष संजय भुंगे यांच्यात पैशावरुन वाद सुरु होता. यावेळी अक्षयचा भाऊ अजय बिषणसिंग राजपूत आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीना गायके यांचा मुलगा विशाल रामराव गायके हा देखील तेथे उपस्थित होता. पियूष भुंगे याच्याकडे असलेल्या पैशांची मागणी अक्षय राजपूत करत असताना या दोघांमध्ये झटापट झाली. त्यांच्यातील वाद वाढत असल्याचे पाहून अजय राजपूत आणि विशाल गायके हे मध्यस्थी करण्यासाठी गेले. चौघांमध्ये वाद सुरु असताना रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी पोलिसांशी देखील चौघांचा वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत विशाल गायके आणि पियूष भुंगे यांना बेदम मारहाण झाली. यानंतर जखमी अवस्थेत पियूष भुंगे याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर विशाल गायकेवर रात्री घाटीत उपचार करण्यात आले. याचदरम्यान पोलिसांनी अक्षय राजपूतला अटक केली. तर अजय राजपूत हा घटनास्थळाहून पसार झाला. या घटनेनंतर गुन्हे शाखेचे अंमलदार काकासाहेब अधाने यांच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपनिरीक्षक संदीप काळे यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप विशालने केल्याचे सांगितले.
गुन्हे शाखा पोलिसांच्या मारहाणीचा आरोप
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीना गायके यांचा मुलगा विशाल हा भांडण सोडविण्यासाठी गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप गायके कुटुंबियांनी केला आहे. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा :

छ.संभाजीनगर: शिवण्यात ४ घरे, दुकान फोडले; ३ लाखांचा मुद्देमाल लंपास
नागपूर : मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला भीषण आग; वारसा साहित्य जळून खाक
हिंगोली: वारंगा फाटा येथील ५ दुकानांना आग लागून ११ लाखांचे नुकसान

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : माजी नगरसेविकेच्या मुलाला मारहाण; पोलिसांवर आरोप Brought to You By : Bharat Live News Media.