आम्ही कोणत्याही चौकशांना सामोरे जाण्यास तयार : मनोज जरांगे

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : सरकारसोबत सगे सोयऱ्या विषयी चर्चा झालेली आहे. फक्त तोच विषय. जो अध्यादेश निघालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकारने करावी. हा एकच विषय संवाद दौऱ्यात राहणार आहे. सरकारने आमची एसआयटी चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊदे. आम्ही कोणत्याही चौकशांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे आव्हान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला दिले. जरांगे आजपासून (दि.१०) पाच दिवशीय दौऱ्यावर रवाना झाले. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. Manoj Jarange-Patil
जरांगे बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा दौऱ्यादरम्यान मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते म्हणाले की, या दौऱ्यात समाज बांधवांशी संवाद साधला जाणार असून सगे सोयऱ्याची सरकारने अंमलबजावणी करावी, या एकाच विषयावर चर्चा होणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही. Manoj Jarange-Patil
लोकसभेचे उमेदवार देण्याची तयारी जोरदार सुरू आहे, यावर जरांगे म्हणाले की, ती समाजाची भूमिका आहे. तो राजकीय विषय माझा नाही. राजकारण हा माझा मार्ग नाही. समाज माझा मालक आहे. मी समाजाचा नाही. तो समाजाचा निर्णय आहे. समाज काहीही निर्णय घेऊ शकतो आणि त्यांना तो अधिकार आहे. सर्वसामान्य माणसाने निवडणुकीला उभे राहू नये का? राजकारण्यांनी सातत्याने निवडणुकीला उभे राहावे आणि सामान्य जनतेने राहू नये, असा कोणता नियम आहे का? मराठाच काय कोणत्याही जाती धर्माचे लोक उभे राहू शकतात. तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे समाजाने कोणती भूमिका घ्यावी हा समाज ठरवेल. माझा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा
Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मनोज जरांगेंचे मोठे विधान, म्हणाले…
Manoj Jarange-Patil: जरांगे-पाटील यांना अतिरेकी ठरवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
Eknath Shinde on Manoj Jarange Patil | फडणवीसांचा एकेरी उल्लेख, पंतप्रधानांबद्दल चुकीचे उद्गगार, तुम्हाला शोभतं का? मुख्यमंत्री शिंदे जरांगेंवर बरसले
Latest Marathi News आम्ही कोणत्याही चौकशांना सामोरे जाण्यास तयार : मनोज जरांगे Brought to You By : Bharat Live News Media.
