आर्ची कॉमिक माझ्यासाठी जग : दिग्दर्शिका झोया अख्तर

दीपक जाधव
पणजी
आयकॉनिक आर्ची कॉमिकची निरागसता आणि मैत्री आजच्या तरुण पिढीसाठी प्रसारित करण्याची इच्छा आहे. (IFFI Goa ) आर्ची कॉमिक हे माझ्यासाठी जग आहे, अशी भावना फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी व्यक्त केली. ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’द आर्चीज – मेड’ या विषयावरील ’इन कन्व्हर्सेशन’ सत्रात झोया अख्तर बोलत होत्या. (IFFI Goa )
त्या म्हणाल्या, आर्ची कॉमिकचे सार आणि बारकावे, यातून एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव बनवणे खूप आव्हानात्मक होते. माझ्या बालपणाचा हा एक मोठा भाग होता. ही पात्रे प्रतिष्ठित आणि जागतिक स्तरावर प्रिय आहेत. त्यामुळे या प्रोजेक्टचा अनुभव खूपच सुखद होता.
संबंधित बातम्या –
IFFI Goa : मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची इफ्फीत हवा
HBD Kartik Aryan : कार्तिकवर तरुणी का होतात फिदा? संपत्ती पाहाल तर…
Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song: शाहरुखचा असा अंदाज पाहिला नसेल, डंकीचे पहिले गाणे रिलीज
आर्ची कॉमिकचे मुख्याधिकारी जॉन गोल्डवॉटर म्हणाले, आर्ची कॉमिक्सची पात्रे आणि कथा ५० वर्षांहून अधिक काळ जागतिक स्तरावर आणि विशेषत: भारतात चाहत्यांमध्ये गुंजत आहेत. खरेतर ही अभिमानाची गोष्ट आहे. चित्रपट निर्मात्यांनी संपूर्ण चित्रपटात प्रत्येक पात्राची प्रामाणिकता आणि सत्यता अबाधित ठेवली. हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
The post आर्ची कॉमिक माझ्यासाठी जग : दिग्दर्शिका झोया अख्तर appeared first on पुढारी.
पणजी आयकॉनिक आर्ची कॉमिकची निरागसता आणि मैत्री आजच्या तरुण पिढीसाठी प्रसारित करण्याची इच्छा आहे. (IFFI Goa ) आर्ची कॉमिक हे माझ्यासाठी जग आहे, अशी भावना फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी व्यक्त केली. ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’द आर्चीज – मेड’ या विषयावरील ’इन कन्व्हर्सेशन’ सत्रात झोया अख्तर बोलत होत्या. (IFFI Goa ) …
The post आर्ची कॉमिक माझ्यासाठी जग : दिग्दर्शिका झोया अख्तर appeared first on पुढारी.
