विदुथलाई-२ चित्रपट पुढील वर्षी भेटीला, दिग्दर्शक वैत्रिमानर यांची घोषणा

पणजी तामिळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी त्याला दाद दिली. अगदी त्याच्या परस्पर विरोधी म्हणजे गंभीर भूमिका मी विदुथलाई 1 मध्ये मुख्य नायकाच्या रुपात साकारली आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते, असे प्रतिपादन विदुथलाई 1 चे अभिनेते सुरी यांनी केले. (IFFI 2023 ) दरम्यान, विदुथलाई 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, … The post विदुथलाई-२ चित्रपट पुढील वर्षी भेटीला, दिग्दर्शक वैत्रिमानर यांची घोषणा appeared first on पुढारी.

विदुथलाई-२ चित्रपट पुढील वर्षी भेटीला, दिग्दर्शक वैत्रिमानर यांची घोषणा

दीपक जाधव

पणजी
तामिळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी त्याला दाद दिली. अगदी त्याच्या परस्पर विरोधी म्हणजे गंभीर भूमिका मी विदुथलाई 1 मध्ये मुख्य नायकाच्या रुपात साकारली आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते, असे प्रतिपादन विदुथलाई 1 चे अभिनेते सुरी यांनी केले. (IFFI 2023 ) दरम्यान, विदुथलाई 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी घोषणा दिग्दर्शक वैत्रिमारन यांनी दिली. (IFFI 2023)
संबंधित बातम्या –

IFFI Goa : आर्ची कॉमिक माझ्यासाठी जग : दिग्दर्शिका झोया अख्तर
IFFI 2023 Goa : अँड्रो ड्रीम्स’ने भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ
IFFI Goa : मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची इफ्फीत हवा

सुरी म्हणाले, हा चित्रपट करताना अनेक समस्या समोर होत्या. कॉमेडियन हा शिक्का पुसण्यासोबतच गंभीर भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरविणे माझ्यासाठी महत्वाचे होते. या चित्रपटामुळे मला खूप काही शिकता आले.
दिग्दर्शक वैत्रिमानर म्हणाले, सुरी जरी कॉमेडियन असले तरी ते चांगले अभिनेते आहेत. त्यांच्या डोक्यातच सीन तयार असायचा. त्यामुळे कमीत कमी रिटेक घ्यावे लागले. रेल्वे अपघताचा सीन प्रचंड अवघड होता. त्यासोतच जंगलातील सीन करताना वन्यप्राण्यांचा धोका होता. त्यासोबतच लायटिंगची समस्या होती. त्यावर मात करीत आम्ही उच्च दर्जाचा चित्रपट बनविण्यात आम्ही अशस्वी ठरलो. या चित्रपटासाठी स्टार चेहर्‍याऐवजी नवा चेहरा हवा होता. त्यासाठी सुरी हेच योग्य होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी नदीम थुफुल, एलरेड कुमार संथानम आदी उपस्थित होते.
The post विदुथलाई-२ चित्रपट पुढील वर्षी भेटीला, दिग्दर्शक वैत्रिमानर यांची घोषणा appeared first on पुढारी.

पणजी तामिळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी त्याला दाद दिली. अगदी त्याच्या परस्पर विरोधी म्हणजे गंभीर भूमिका मी विदुथलाई 1 मध्ये मुख्य नायकाच्या रुपात साकारली आहे. ही भूमिका साकारणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते, असे प्रतिपादन विदुथलाई 1 चे अभिनेते सुरी यांनी केले. (IFFI 2023 ) दरम्यान, विदुथलाई 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, …

The post विदुथलाई-२ चित्रपट पुढील वर्षी भेटीला, दिग्दर्शक वैत्रिमानर यांची घोषणा appeared first on पुढारी.

Go to Source