प्रभाकर धुरी
पणजी: प्रत्येक शिवसैनिकाने अर्जुन मालवणकरसारखे बनावे,असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्जुन चित्रपट पाहून वाटल्याने त्यांनी फोन करून आपल्यासोबत सभेला ये असे सांगितले होते, अशी आठवण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी सांगितली. (IFFI 2023)
अभिनेता सनी देओल याच्या एका चित्रपटामुळे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांना दोन फोन कॉल आले होते. त्यातील एक कॉल आला होता, अंडरवर्ल्डमधून तर दुसरा फोन कॉल होता थेट ‘मातोश्री’वरून बाळासाहेब ठाकरे यांचा. (IFFI 2023)
गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात रवैल यांनी ही माहिती प्रेक्षकांसोबत शेअर केली.
कला अकादमी येथे रंगलेल्या या कार्यक्रमात सनीसोबत काम केलेले राहुल रवैल, राजकुमार संतोषी आणि अनिल शर्मा हे दिग्दर्शक सहभागी झाले होते. या चौघांच्या संवादातून सनीच्या फिल्मी कारकिर्दीचा आलेख प्रेक्षकांसमोर मांडला गेला.
सनीच्या अर्जुन या चित्रपटाविषयी बोलताना त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल म्हणाले की, या चित्रपटातील बऱ्याचशा दृश्यांवर अंडरवर्ल्डमधील घटनांचा प्रभाव होता. त्यामुळे या चित्रपटानंतर दोन फोन कॉल मला आले होते.
त्यातील एक फोन कॉल होता अंडरवर्ल्डमधून. त्यावेळी जावेद अख्तरनादेखील चिंता वाटत होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्यांना आवडला. त्यानंतर ‘डोंगरी’तून मला थेट डिनरसाठी बोलावणे आले होते. मला सन्मान करण्यासाठी तिथे बोलावले होते. पण, मी दिल्लीला जाणार असल्याचे सांगून तिकडे जाणे टाळले.
दुसऱ्या फोन कॉलवरील पहिला शब्द होता ‘जय महाराष्ट्र.’ हा फोन कॉल आला होता थेट ‘मातोश्री’वरून बाळासाहेब ठाकरे यांचा या चित्रपटातील सनीने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखेचे नाव होते अर्जुन मालवणकर.
बाळासाहेब मला म्हणाले की, राहुल मी तुझा चित्रपट पाहिला. त्यातील नायक मराठी आहे. मी सभेला चाललो आहे. तु माझ्यासोबत चल. मी तिथे सांगेन की प्रत्येक शिवसैनिकाने अर्जून मालवणकरसारखे बनावे, अशी आठवण रवैल यांनी सांगितले.
हेही वाचा
IFFI 2023| गोवा : ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला सलमान खानला निमंत्रण
IFFI 2023 : इफ्फीत माधुरी दीक्षितला ‘विशेष सन्मान’ पुरस्कार
Salman Khan IFFI : भरगर्दीत सलमानने घेतला ‘तिचा’ किस, बघता क्षणी व्हिडिओ व्हायरल
The post ‘अर्जुन’ चित्रपटाबद्दल राहुल रवैल यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण appeared first on पुढारी.
पणजी: प्रत्येक शिवसैनिकाने अर्जुन मालवणकरसारखे बनावे,असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्जुन चित्रपट पाहून वाटल्याने त्यांनी फोन करून आपल्यासोबत सभेला ये असे सांगितले होते, अशी आठवण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी सांगितली. (IFFI 2023) अभिनेता सनी देओल याच्या एका चित्रपटामुळे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांना दोन फोन कॉल आले होते. त्यातील एक कॉल आला …
The post ‘अर्जुन’ चित्रपटाबद्दल राहुल रवैल यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण appeared first on पुढारी.