शेतकऱ्याच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान
शिरपूर, पुढारी वृत्तसेवा- शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी येथील मधुकर लक्ष्मण गायकवाड कोकणी यांच्या शेतातील राहत्या घराला 19 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.30 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य, कापसाचे बंडल, शेतीचे अवजारे, धान्य, कपडे, कागदपत्रे इत्यादी जळून खाक झाले. या आगीतून कोकणी कुटुंबीयांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग रात्री लागल्यामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. आग भीषण असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना आवरणे कठीण झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे सुरुवातीला काय झाले आहे याची कुणालाही कल्पना येत नव्हती. शेवटी गावातून मोठ्या प्रमाणात लोक मदतीसाठी आले आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.
मधुकर कोकणी हे आपल्या थोडशा शेतीवर प्रपंच चालवतात. यावर्षी पाऊस नसल्यामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतीतील एकेक बोंड जमा करून नुकतेच सदरील घरात ठेवले होते. त्या कापसाचा एकही बोंड बाजारात विक्री केलेला नव्हता. त्यामुळे काढून ठेवलेला सुमारे 15 क्विंटल कापूस आगीत जळून खाक झाला आहे. याशिवाय, घरातील सर्व कपडे, संसारउपयोगी साहित्य, शेतीच्या अवजारे, धान्य, मुलांसाठीचे खेळणी, कपडे, तसेच दोघांच्या कागदपत्रेही आगीत जळून खाक झाली आहेत.
आगीतून झालेल्या नुकसानीमुळे कोकणी कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. बी बियाणे, खत, औषधे खरेदी करण्यासाठी कोकणी यांनी नातेवाईकांकडून व्याजाने पैसे उसने घेतलेले आहेत. आता हे पैसे कसे परत करायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच सांगवीचे सरपंच कन्हैयालाल पावरा, मा. जि. प. सदस्य योगेश बादल यांनी घटनास्थळी धाव घेऊन तलाठी पावरा यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. सांगवीचे तलाठी पावरा यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पंचनाम्यात सुमारे 4, 84,100 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पंचनामा वेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
आमदार काशीराम पावरा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबाला धीर दिला आणि शासनास्तरावरून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले. शासनाने सदरील घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई कोकणी कुटुंबाला द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
The post शेतकऱ्याच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.
शिरपूर, पुढारी वृत्तसेवा- शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी येथील मधुकर लक्ष्मण गायकवाड कोकणी यांच्या शेतातील राहत्या घराला 19 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.30 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य, कापसाचे बंडल, शेतीचे अवजारे, धान्य, कपडे, कागदपत्रे इत्यादी जळून खाक झाले. या आगीतून कोकणी कुटुंबीयांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग रात्री लागल्यामुळे …
The post शेतकऱ्याच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.