परभणीत बारावी जीवशास्त्रचा पेपर फुटल्यामुळे खळबळ
परभणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच परभणीतून बारावीचा जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत खळबळ माजली आहे. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळले आहे. (Paper Leak Case)
अलीकडेच राज्याच्या काही भागांत स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार बारावीच्या पेपरबाबत परभणीमध्ये घडला आहे. व्हायरल होत असलेला पेपर बोर्डाच्या परीक्षेचाच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पेपरफुटी रोखणे हे शिक्षण मंडळापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. (Paper Leak Case)
Latest Marathi News परभणीत बारावी जीवशास्त्रचा पेपर फुटल्यामुळे खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.