भाजप राबविणार धक्कातंत्र; राज्यातील विद्यमान खासदारांची तिकिटे कटणार

मुंबई : भाजप लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असून, या यादीत राज्यातील 15 ते 20 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. विद्यमान जवळपास निम्म्या खासदारांची तिकिटे कापली जाणार असून, तेथे नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्यामध्ये गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, रणजितसिंह निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, संजय धोत्रे, अशोक नेते, सुभाष भामरे, रक्षा … The post भाजप राबविणार धक्कातंत्र; राज्यातील विद्यमान खासदारांची तिकिटे कटणार appeared first on पुढारी.

भाजप राबविणार धक्कातंत्र; राज्यातील विद्यमान खासदारांची तिकिटे कटणार

दिलीप सपाटे

मुंबई : भाजप लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असून, या यादीत राज्यातील 15 ते 20 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. विद्यमान जवळपास निम्म्या खासदारांची तिकिटे कापली जाणार असून, तेथे नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्यामध्ये गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, रणजितसिंह निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, संजय धोत्रे, अशोक नेते, सुभाष भामरे, रक्षा खडसे, प्रताप चिखलीकर या खासदारांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. (Lok Sabha Election 2024)
लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांसमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते राज्यातील लोकसभेचे उमेदवार ठरविण्यासाठी दिल्लीत पोहोचले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेते बुधवारी दिल्लीत पोहोचले. बुधवारी सायंकाळी त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अमित शहा यांच्याशी चर्चा केली. यानंतर दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 15 ते 20 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)
धुळे, रावेर, गडचिरोली, माढा, सोलापूर, नांदेड, अकोला आदी लोकसभा मतदारसंघात नवे चेहरे दिले जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार यांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी अहमदनगरमधून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ते लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत. विखेंनी पुत्र सुजय विखे यांना तिकीट द्यायचे नसेल, तर प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी, असा पर्याय दिला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे नाव गोपाळ शेट्टी यांच्या जागी उत्तर मुंबईतून, पूनम महाजन यांच्याऐवजी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची नावे चर्चेत आहेत. (Lok Sabha Election 2024)
ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्यासह प्रकाश मेहता यांचेही नाव चर्चेत आहे. बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकसभा लढवावी असा भाजप श्रेष्ठींचा प्रस्ताव आहे. मात्र, पंकजा मुंडे या त्यास तयार नाहीत. रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचाही पत्ता कट केला जाणार आहे. नांदेड म्हणून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनेच्या उमेदवारीची चर्चा आहे. अकोल्यातून खासदार सुभाष धोत्रे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांची तिकिटेही धोक्यात आहेत. गडचिरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री धर्मराव आत्राम हे भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरू शकतात. (Lok Sabha Election 2024)
भाजप सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांबाबत समाधानी नाही. त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागी अमर साबळे, रणजितसिंह निंबाळकर यांच्या जागी धैर्यशील मोहिते – पाटील यांना संधी देऊ शकते. धुळ्यातून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्या ऐवजी निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर, छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे, दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर आदींची नावे दुसर्‍या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सिद्धार्थ शिरोळे यांची नावे चर्चेत आहेत; पण त्यात मोहोळ हे आघाडीवर आहेत.
Lok Sabha Election 2024 : यांची नावे चर्चेत
सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, धर्मराव आत्राम, मुरलीधर मोहोळ, धैर्यशील मोहिते – पाटील, प्रताप दिघावकर यांची नावे चर्चेत
Lok Sabha Election 2024 : यांची उमेदवारी धोक्यात
गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, रणजितसिंह निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, संजय धोत्रे, अशोक नेते, सुभाष भामरे, रक्षा खडसे, प्रताप चिखलीकर.

Latest Marathi News भाजप राबविणार धक्कातंत्र; राज्यातील विद्यमान खासदारांची तिकिटे कटणार Brought to You By : Bharat Live News Media.