यवतमाळ : घोन्सा येथील आठवडी बाजारात सापडल्या बनावट नोटा; आरोपीस अटक
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : वणी तालुक्यातील घोन्सा येथील आठवडी बाजारात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात वापरत असल्याची माहिती मुकुटबन पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून पोलिसांनी आरोपीला बनावट नोटांसह रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. त्याच्याकडून पाच हजार ७०० रुपये किमतीच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या.
प्रमोद किशन गाडगे (रा. वल्हासा, ता. झरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळ १०० रुपयांच्या २४ नोटा, दोनशे रुपयांच्या ९, तर ५०० रुपयांच्या तीन बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी मुकुटबन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार संतोष मनवर, उपनिरीक्षक प्रवीण हिरे, खुशाल सुरपाम, दीपक ताठे, दिलीप जाधव,शेख नईम, संदीप बोरकर, अंकुश बोरकर यांनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास मुकुटबन केला जात आहे.
Latest Marathi News यवतमाळ : घोन्सा येथील आठवडी बाजारात सापडल्या बनावट नोटा; आरोपीस अटक Brought to You By : Bharat Live News Media.