निवडणूक आचारसंहितेपूर्वी भाजपची गुपचूप जाहिरातबाजी; शिधावाटप केंद्रांवर मोदींचे छायाचित्र

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणुक तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊन आचारसंहिता लागू होवु शकते आपला पक्ष लोकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडू नये त्याकरता राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेल्या प्लॅस्टिक बॅग शिधा वाटप केंद्रात येणाऱ्या गरजू नागरिकांना वितरित करून भाजपा सरकार थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहचून छुपा प्रचार … The post निवडणूक आचारसंहितेपूर्वी भाजपची गुपचूप जाहिरातबाजी; शिधावाटप केंद्रांवर मोदींचे छायाचित्र appeared first on पुढारी.

निवडणूक आचारसंहितेपूर्वी भाजपची गुपचूप जाहिरातबाजी; शिधावाटप केंद्रांवर मोदींचे छायाचित्र

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणुक तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊन आचारसंहिता लागू होवु शकते आपला पक्ष लोकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडू नये त्याकरता राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेल्या प्लॅस्टिक बॅग शिधा वाटप केंद्रात येणाऱ्या गरजू नागरिकांना वितरित करून भाजपा सरकार थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहचून छुपा प्रचार करत आहे.

निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्लॅस्टिक बॅगचे वाटप करण्यात यावे असा आदेशच राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा खात्या तर्फे शिधावाटप केंद्रधारकांना धाडण्यात आला आहे. वाटप केल्यानंतर शिधा धारकाचा बॅगसह एक फोटो देखील विभागीय शिधा अधिकाऱ्यांच्या मोबाईल वर पाठवण्याचे वितरकांना सांगण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी देखील नागरिकांना बॅग वाटप करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबद्दल शिधावाटप केंद्र धारकांनी मात्र शासनाच्या ह्या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे.

मुंबईचा मुख्य शिधा वाटप कार्यालयाचा आधीपत्याखाली दहिसर, वाशी ते थेट बदलापूर पर्यंतची शिधावाटप केंद्रे येतात. ह्या विभाग अंतर्गत एकूण ३००० शिधा वाटप केंद्र आहेत. ह्यात जवळजवळ १७ लाखाच्यावर शिधा धारकांची नोंद आहे.ह्या सर्वांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे छायाचित्र असेल्लेया एकूण १० लाख बॅग शिधा वाटप केंद्रांनावर येणाऱ्या  नागरिकांना वितरित करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. ह्या १० किलो शमतेच्या प्लॅस्टिक बॅग निवडणक आचारसंहिता लागण्यापूर्वी वितरित करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

ह्या विषयी एका शिधा वाटप दुकांदराशी बोलो असता त्याने हे काम आमच नाही असे सांगितले हे काम मंत्री आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.ह्यासाठी सरकारने आमचा वापर करू नये इतर पक्षाचे पदाधिकारी ह्या गोष्टीला विरोध करत आहेत.आमचा राजकारणाशी काही संबंध नाही आम्ही दुकानदार आहोत.आम्ही आमच्या पोटापाण्यासाठी व्यवसाय करत आहोत.

Latest Marathi News निवडणूक आचारसंहितेपूर्वी भाजपची गुपचूप जाहिरातबाजी; शिधावाटप केंद्रांवर मोदींचे छायाचित्र Brought to You By : Bharat Live News Media.